रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई समोर 197 धावांचे लक्ष ठेवले आहे. सर्वाधिक धावा कर्णधार रजत पाटीदार यांने केल्या. तो 51 धावा करून बाद झाला. त्याने तिन षटकरा आणि दोन चौकार लगावले. तर टिम डेव्हिडने शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. त्याने आठ चेंडूत 22 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे चेन्नई समोर बंगळुरूला चांगले लक्ष्य ठेवता आले आहे. त्यामुळे चेन्नई आता या धावांचा पाठलाग कसा करते हे पाहावे लागेल. चेन्नईची फलंदाजी मजबूत समजली जाते. त्यामुळे या सान्यात कोण विजय मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्या आयपीएलचा सामना होत आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी बंगळूरच्या डावाची सुरुवात केली. सॉल्ट यांना आक्रमक भूमीका घेतल 16 चेंडूत 32 धावा केल्या. त्यात एक षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे. त्याला. नूर अहमदच्या गोलंदाजीवर त्या धोनीने स्टम्पिंग केले. त्यानंतर देवदत्त पाडिक्कल याने 14 चेंडूत 27 धावांची खेळी केली. त्यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्याला आर अश्वीनने बाद केले.
विराट कोहलीची ही काही जागू चालली नाही. त्याने संथ फलंदाजी करत 30 चेंडूत 31 धावा केल्या. त्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. त्यालाही नूर अहमदने बाद केले. लियाम लिविंगस्टोन याला ही जास्तवेळ मैदानात उभं राहाता आलं नाही. त्याने नऊ चेंडूत दहा धावा केल्या. त्यात एक षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे कर्णधार रजत पाटीदार हा खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता. पंधरा षटकात बंगळूरूने जवळपास 150 धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी चार फलंदाज बाद झाले होते.
रजत पाटीदार याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने तीस चेंडूत अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने चार चौकार आणि तीन षटकार ठोकरे. दुसऱ्या बाजूने त्याला जितेश शर्माची चांगली साथ मिळाली. या समान्यात विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले होते. कोहलीने 31 धावा केल्या पण त्याला आक्रमक खेळी करता आली नाही. तर धोनीने चपळाई दाखवत एक स्पम्पिंग केले. त्यामुळे त्याचे चाहते खूष झाले.