IPL 2025 Final: ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या RCBचं टेन्शन वाढलं! स्फोटक फलंदाज अंतिम सामन्याला मुकणार?

IPL 2025 RCB Vs PBKS Final: विराट कोहली आणि फिल साल्टची जोडी पुन्हा एकदा अंतिम फेरीत दिसते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2025: आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज संध्याकाळी 7.30  वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघ पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करतील. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्याच वेळी, अंतिम सामन्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून त्यांचा धडाकेबाज फलंदाज फिल सॉल्ट अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज फिल सॉल्टने या संपूर्ण हंगामात आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात त्याची खेळी संघासाठी खूप महत्त्वाची आहे, परंतु  फिल सॉल्ट पंजाब किंग्जसोबतच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. ईएसपीएनच्या अहवालानुसार, फिल साल्ट आरसीबीच्या शेवटच्या सराव सत्रात उपस्थित राहिला नाही. मात्र तो सराव सत्रात का उपस्थित राहिला नाही याचे कारण अद्याप कळलेले नाही.

Advertisement

दरम्यान, या बातमीनंतर आरसीबीच्या चाहत्यांचेही टेन्शन वाढले आहे कारण तो दुखापतग्रस्त झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.  दुसरीकडे, फिल सॉल्टबाबत संघाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता  विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी पुन्हा एकदा अंतिम फेरीत दिसते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

( नक्की वाचा : 'मी टीमला निराश करत होतो', पंजाब किंग्जच्या दिग्गजाची अचानक निवृत्ती )

दरम्यान, यावेळी विराट कोहलीला फिल सॉल्टच्या रूपात एक नवीन जोडीदार मिळाला आहे. या दोघांच्या सलामी जोडीने या हंगामात आरसीबीसाठी भरपूर धावा केल्या आहेत. फिल सॉल्टने सीझन-18 मध्ये फलंदाजी करताना आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 387 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 4 अर्धशतके केली आहेत. क्वालिफायर 1 मध्ये सॉल्टने पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना धुडकावून लावले होते.

असा असेल संभाव्य संघ:  फिल सॉल्ट,  विराट कोहली,  मयंक अग्रवाल,  रजत पाटीदार (क),  लियाम लिव्हिंगस्टोन/टिम डेव्हिड,  जितेश शर्मा (विकेटकीपर),  रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या,  भुवनेश्वर, जोश कुमार, सुयश शर्मा

IPL Final Predictions: IPL 2025चा विजेता कोण? AI ने केली मोठी भविष्यवाणी; 'हा' संघ बाजी मारणार?