IPL 2025 KKR Vs MI: आयपीएल 2025मधील 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात केकेआरचा संघ अवघ्या 116 धावांवर ऑलआऊट झाला. मुंबईच्या भेदक माऱ्याने कोलकात्याचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. यासोबतच कोलकाताने मुंबईसमोर विजयासाठी 117 धावांचे लक्ष ठेवले आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात खराब झाली, पॉवरप्लेमध्येच त्यांनी चार विकेट गमावल्या. कोलकाताला पहिला धक्का ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात बसला. त्याने सुनील नरेनने शून्यावर बाद केले. त्यानंतर दीपक चहरने कोलकात्याला दुसरा धक्का दिला. त्याने क्विंटन डी कॉकचा काटा काढला. त्यापाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणे 11 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर केकेआरचा डाव गडगजला.
कोलकाता नाईट रायडर्स संघ 116 धावांवरच गारद झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मुंबईला जिंकण्यासाठी 117 धावांची आवश्यकता आहे. केकेआरकडून अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक 26 धावा केल्या. रमणदीप सिंगने शेवटी 22 धावा जोडल्या. त्याने 12 चेंडूंचा सामना केला आणि 2 षटकार आणि एक चौकार मारला.
मुंबईसाठी अश्विनी कुमारने पदार्पणाच्या सामन्यातच धुमाकूळ घातला. त्याने 3 षटकांत 24 धावा देत 4 बळी घेतले. दीपक चहरने 2 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले. हार्दिक पंड्या, विघ्नेश पुथूर, मिशेल सँटनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.