IPL 2025 KKR VS RCB: आजपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या थराराला सुरुवात होत आहे. आयपीएलमधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार अजिंक्य रहाणेच्या वादळी अर्थशतकीच्या जोरावर कोलकाताच्या संघाने 174 धावा केल्या असून बंगळुरुच्या संघासमोर विजयासाठी175 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावर फलंदाजी करताना कोलकाताच्या सलामीच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. आयपीएल 2025च्या पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेकडून तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक फक्त 25 चेंडूत पूर्ण केले.
अजिंक्य रहाणे 56 धावा करुन बाद झाला. त्यासोबतच सुनील नारायणनेही 44 धावांचे योगदान केले. या दोघांची जोडी फुटल्यानंतर कोलकाताचा डाव गडगडला. सुनील नरेनने अजिंक्य रहाणेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली. त्यानंतर 10 चेंडूत 12 धावा करुन बाद झाला. तर धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलही अवघ्या चार धावा करुन बाद झाला.
दरम्यान, या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा जलवा पाहायला मिळाला. आयपीएल 2025 मधील पहिले अर्धशतक कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने झळकले. बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने फक्त 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सुयश शर्माने टाकलेल्या नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड आणि यश दयाल.