IPL 2025 KKR VS RCB: 2025च्या आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यामध्ये झाला. या सामन्यात आरसीबीने जबरदस्त कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 175 धावांचे आव्हान आरसीबीच्या संघाने 16 व्या षटकामध्ये पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार नाबाद 59 धावांची अर्धशतकी खेळी करत आरसीबीच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
कोलकाताच्या संघाने दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघाने वादळी सुरुवात केली. विराट कोहलीने सामन्याच्या सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजी केली. विराट कोहलीने सामन्यात सर्वाधिक 59 धावांची वादळी खेळी केली. कर्णधार रजत पाटीदारने 34 तर सॉल्टने 56 धावा केल्या. या तिन्ही खेळाडूंच्या धमाकेदार खेळीमुळेच आरसीबीने 16 व्या षटकात विजय मिळवला.
सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून आरसीबीच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार अजिंक्य रहाणेने अवघ्या 25 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 रन्सची पार्टनरशीप केली. रसीख सलाम याने ही जोडी फोडली.
रसीखने सुनीलला 10 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आऊट केलं. सुनीलने 26 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह 44 रन्स केल्या. सुनील आऊट झाल्यानंतर रहाणेही बाद झाला. त्यानंतर कोलकाताचा डाव गडगडला. कोलकाताच्या संघाकडून अंगगकृष याने 30 धावा केल्या. तर रिंकूने 12 धावांचं योगदान दिलं. तर उपकर्णधार वेंकटेश अय्यर याने 6 धावा केल्या.