IPL 2025 KKR vs RR: आयपीएलच्या मैदानात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना पार पाडला. या सामन्यात राजस्थानला धुळ चारून कोलकाताच्या संघाने पहिला विजय नोंदवला तर राजस्थानचा दुसरा पराभव झाला. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 252 धावांचे आव्हान कोलकाताच्या संघाने 18 व्या षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. कोलकाताकडून कर्णधार डिकॉकने सर्वाधिक 97 धावांची खेळी केली.
आयपीएल 2025 च्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 8 गडी राखून पराभव केला. या हंगामात केकेआरचा हा पहिलाच विजय आहे. राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात प्रथम खेळल्यानंतर राजस्थानने 20 षटकांत 9 गडी गमावून १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआरने 18 व्या षटकात फक्त दोन गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. केकेआरकडून क्विंटन डी कॉकने 61 चेंडूत 97 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 6 षटकार लागले.
सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. राजस्थानला चौथ्या षटकामध्ये संजू सॅमसनच्या रुपाने पहिला धक्का बसला. संजू सॅमसनने 11 चेंडूंमध्ये 33 रन केल्या. त्यानंतर रियान पराग आणि यशस्वी जयस्वालने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या निराशेनंतर राजस्थानच्या उर्वरित खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. ध्रुव जुरेलने 28 चेंडूंमध्ये 33 तसेच संजू सॅमसनने 11 चेंडूंमध्ये 33 रन केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती, मोईन अली, हर्षित राणा आणि वैभव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.