SRH Vs LSH: निकोलसचे तुफान... लखनौकडून हैदराबादचा धुव्वा, 5 विकेट्सने दणदणीत विजय

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants:या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौसमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले होते

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2025 SRH Vs LSG: आयपीएल 2025 चा 7 वा सामना आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पाडला. या रोमहर्षक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने हैदाराबादच्या संघाला पाच विकेट्सने धुळ चारली. हैदराबादच्या संघाने दिलेल्या 191 धावांचे आव्हान लखनौने 17 व्या षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. लखनौकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 67 धावा केल्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हैदराबादच्या संघाने दिलेल्या 191 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौची सुरुवात आक्रमक झाली. सलामवीर मिशेल मार्श आणि निकोलस पुरनने पॉवर प्लेमध्ये तुफानी फलंदाजी केली. पुरनने अवघ्या 20 धावांमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. निकोलस पूरन 70 धावा करून बाद झाला. त्याने 26 चेंडूत 6 चौकार आणि ६ षटकार मारले. अर्धशतक झळकावल्यानंतर मिचेल मार्श बाद झाला. त्याने 31 चेंडूंचा सामना करत 52 धावा केल्या. 

तत्पुर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौसमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादवने भेदक मारा करत हैदराबादच्या दिग्गजांना स्वस्तात तंबुत पाठवले. शार्दुल ठाकूरने अभिषेक शर्मा आणि इशान किशानला आऊट केले. अभिषेक शर्मा अवघ्या सहा धावांवर बाद झाल्यानंतर ईशान किशानही शून्यावर तंबुत परतला.

हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडसह अनिकेत वर्माने 13 चेंडूत 36 धावा केल्या. त्याने 5 षटकार मारले. नितीश रेड्डीने 32 धावांचे योगदान दिले. तर अभिषेक शर्मा 6 धावा करून बाद झाला. क्लासेन 26 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पॅट कमिन्सने 4 चेंडूत 18 धावा केल्या. शार्दुलने 4 षटकांत 4 विकेटसह 34 धावा दिल्या. दिग्वेश राठी, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी  1विकेट घेतली.

Advertisement

लखनौ सुपर जायंटसचा संघ: एडिन मार्कराम, मिशेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेविड मिलर, आयुष बदोनी, शार्दूल ठाकुर, रवि बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव

सनरायजर्स हैदराबादचा संघ: अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

Advertisement