MI vs CSK: वानखेडेवर मुंबईचीच हवा, 'हिटमॅन'च्या वादळात चेन्नईची धुळधाण

रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी चेन्नईचा डाव सांभाळला. शिवम दुबेने 32 चेंडूत 50 धावा ठोकल्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
फोटो सौजन्य- आयपीएल

चेन्नईने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकलट यांनी चांगली सुरूवात केली. 6 ओव्हरमध्ये या दोघांनी 63 धावांची सलामी दिली. 19 चेंडूत 24 धावा करत रायन हा तंबूत माघारी परतला. रोहित शर्माला मात्र या सामन्यात चांगलाच सुर सापडला. त्याने फटकेबाजी करत अर्धशतक ठोकले. रोहित आणि सुर्यकुमार यादव यांनी नंतर मुंबईची धावसंख्या वाढवली.  दोघांनी ही आक्रमक खेळी करत आपली अर्धशतकं केली. चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाची या दोघांनी चांगलीच धुलाई केली. सुर्यकुमार यादवने षटकार मारत मुंबईचा विजय मिळवून दिला. मुंबईने चेन्नईचा 9 गडी राखत पराभव केला. चेन्नईने दिलेले लक्ष्य मुंबईने सोळाव्या षटकात पूर्ण केले. मुंबईने 177 धावा केल्या. रोहितने 45  चेंडूत 76 धावांची धमाकेदार खेळी केली. त्यात त्याने 6 सिक्स आणि 4 फोर ठोकले. त्यात सुर्या ही कुठे मागे राहिला नाही. सुर्याने 30 चेंडूत 68 धावांची खेळी केली. त्यात 5 सिक्स तर 6 फोर लगावले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला फलंदाजी करण्याचं आमंत्रण देण्यात आलं. चेन्नईने या सामन्या मुळचा मुंबईकर असलेल्या आयुष म्हात्रेला पदार्पणाची संधी दिली. त्यामुळे तो कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चेन्नईची सुरूवात शाइक रशिद आणि रचिन रविंद्र यांनी केली. पण या सामन्यात रचिन रविंद्र अपयशी ठरला. तो अवघ्या पाच धावा करून बाद झाला. त्यानंतर पहिलाच सामना खेळत असलेल्या आयुष म्हात्रे मैदानावर आला. त्यानेही मुंबईकरां बरोबरच चेन्नईला ही नाराज केले नाही. त्यांनी धमाकेदार खेली करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले.त्याने 15 चेंडूंचा सामना करत 32 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने 2 सिक्स आणि 4 कडक चौकार लगावले. त्याला दीपक चाहरने बाद केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: दिमाखदार विजय.. पण एक चूक भोवली, शुभमन गिलला BCCIचा दणका

शाइक याला ही जास्त वेळ खेळपट्टीवर थांबता आले नाही. तो ही 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी चेन्नईचा डाव सांभाळला. शिवम दुबेने 32 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्यात त्याने 4 सिक्स आणि 2 लगावले. दुबेचे हे होमग्राऊंड असल्याने त्याच फायदा त्याने उचलला. तर रविंद्र जडेजाने दुसऱ्या बाजू लावून धरत 35 चेंडूत 53 धावा केल्या. त्यात त्याने दोन सिक्स तर चार फोर मारले. शेवटच्या षटकांत फलंदाजीला आलेल्या कॅप्टन धोनीला केवळ चार धावा करता आल्या. तो सहा चेंडूत चार धावा करून आऊट झाला. रविंद्र जडेजा नॉट आऊट राहीला. चेन्नईने 20 षटकात 176 धावा केल्या. चेन्नईचे 5 फलंदाज बाद झाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: बंगळुरूचा पंजाबवर रॉयल विजय, कोहलीला सुर गवसला

मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराने दोन फलंदाना बाद करत टिच्चून गोलंदाजी केली. मिचेल सँटनरनेही तीन षटकात अवघ्या 14 धावा दिल्या. त्याने एक फलंदाज बाद केला. अश्वानी कुमार आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केले. मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 177 धावांचे लक्ष मिळाले. 
 

Advertisement