IPL 2025 MI Vs LSG: आयपीएलच्या मैदानात आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सुपर संडेचा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवत लखनौला जोर का झटका दिला. मुंबईने दिलेल्या 216 धावांच्या आव्हांनाचा पाठलाग करताना लखनौचा डाव अवघ्या 161 धावांवर गडगडला. मुंबईचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत लखनौचे कंबरडे मोडले.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 216 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौची सुरुवात खराब झाली. लखनौला निकोलस पुरनच्या रुपाने पहिला धक्का बसला. निकोलस पूरननंतर कर्णधार ऋषभ पंतही आऊट झाला आहे. त्याला विल जॅक्सने आऊट केले. सलामीचे फलंदाज बाद होताच जसप्रीत बुमराहने लखनौला मोठा धक्का दिला. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात तीन विकेट्स घेतल्या. प्रथम त्याने डेव्हिड मिलरला 24 धावांवर बाद केले. यानंतर अब्दुल समदला दोन धावांवर आणि आवेश खानला 0 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले.
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी केली. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांनी वादळी सुरुवात केली आणि अवघ्या 3 ओव्हरमध्ये 30 धावा केल्या. रोहित शर्माने पहिल्या दोन चेंडूंवर सिक्स मारून सुरुवात केली पण त्यानंतर त्याने आपली विकेट गमावली. मयंक यादवच्या चेंडूवर प्रिन्सने त्याचा झेल टिपला. त्यानंतर रायन रिकेल्टनने डाव सावरत 25 बॉलमध्ये 5चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले.
तो 32 चेंडूत 58 धावा काढल्यानंतर दिग्वेश राठीचा बळी ठरला. प्रिन्स यादवने 29 धावांवर विल जॅक्सला बाद करून लखनौ संघाला मोठे यश मिळवून दिले. लखनौ संघाला जास्त त्रास न देता रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर तिलक वर्मा अवघ्या 6 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 27 चेंडूत अर्धशतक ठोकले.