MI vs PBKS : पंजाबची बल्ले बल्ले, मुंबईचा केला पराभव, आता प्ले ऑफचं आव्हान

पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात पंजाबने टॉस जिंकला.

जाहिरात
Read Time: 2 mins

पंजाबने मुंबईने दिलेल्या लक्षाचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबची सुरूवात ही चांगली झाली. जॉश इंग्लिश याने चांगली फलंदाजी करत पंजाबला विजयाचे जवळ नेले. त्याने 42 बॉलमध्ये 73 धावा ठोकल्या. त्या आधी प्रियांश आर्य याने 62 धाव करत विजयाचा पाया रचला. श्रेयस अय्यरने 16 चेंडूत 26 धावा केल्या. मुंबईच्या या पराभवामुळे मुंबई प्ले ऑफमध्ये चौथ्या क्रमांकावर गेले आहे. त्यामुळे त्यांना या पुढच्या मॅच नॉक आऊट असतील. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात पंजाबने टॉस जिंकला. त्यानंतर त्यांनी मुंबईला बॅटींगसाठी आमंत्रीत केले. पण मुंबईला 20 ओव्हर्समध्ये 187 धावा करता आल्या. त्यासाठी 7 फलंदाज आऊट झाले. सुर्यकुमार यादव याने 39 चेंडूत 57 धावा केल्या. मुंबईकडून सुर्यानेच सर्वाधिक धावा केल्या.  मुंबईच्या इतर बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 

ट्रेंडिंग बातमी - Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबई का तुंबली? ठाकरेंचे प्रश्न एकनाथ शिंदेंची उत्तरं

रायन रिकलटन आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरूवात केली. रायन ने 27 तर रोहितने 24 धावा केल्या.  तिलक वर्माला ही फक्त एक धाव करता आली. विल जॅक्स, हार्दीक पांड्या, नमन धीर यांनी छोटी खेळी केल्या. पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईला 187 धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाब समोर 188 धावांचे लक्ष ठेवण्यात आले. 
 

Topics mentioned in this article