IPL 2025: बंगळुरूचा पंजाबवर रॉयल विजय, कोहलीला सुर गवसला

त्या आधी बंगळुरूने टॉस जिंकत प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेत पंजाबला बॅटींगसाठी पाचारण केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
फोटो सौजन्य- आयपीएल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेलं 157 धावांचं लक्ष्य बंगळुरूनं सहज पार केले. 19 व्या ओव्हरमध्ये बंगळुरूने 3 गडी गमावत 159 धावा केल्या.  या सामन्यात विराट कोहली आणि देवदत्त पाडिक्कल यांनी अर्ध शतक झळकावत पंजाबच्या आव्हानची हवाच काढली. पाडिक्कल याने 35 चेंडूत 61 धावांची धुवांदार खेळी केली. त्यात त्याने चार खणखणीत  षटकार आणि पाच चौकार लगावले. विरोट कोहलीने 54 चेंडूत 73 धावांची खेळी केली.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्या आधी बंगळुरूने टॉस जिंकत प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेत पंजाबला बॅटींगसाठी पाचारण केलं. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंह यांनी  चार ओव्हरमध्ये 42 धावांची सलामी दिली. प्रियांशने 22 तर  प्रभसिमरनने 33  धावा केल्या. दोघांनाही कुणाल पांड्याने आऊट केलं. कॅप्टन श्रेयस अय्यर पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ सहा धावा करता आल्या. त्यानंतर जॉश इंग्लीस,शशांक सिंग आणि मार्को यान्सिन यांनी थोडा प्रतिकार केला पण त्यांना मोठी खेळी उभारता आली नाही. 

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: दिमाखदार विजय.. पण एक चूक भोवली, शुभमन गिलला BCCIचा दणका

पंजाबचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे 20 ओव्हर्समध्ये पंजाबला केवळ 157 धावा करता आल्या. बंगळुरूकडून कुणाल पांड्या याने दोन फलंदाजांना बाद केले. तर सुयाश शर्मा याने ही चांगली साथ पांड्याला देत दोन गडी बाद केले. रोमारियो शेफर्ड याने एक फलंदाज बाद केला. भुवनेश्वर कुमार, यश दयाल आणि हेझलवुड यांना एकही फलंदाज बाद करता आला नाही. पंजाबकडून अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.