Aditi Hundia: फॅशन विश्वातलं मोठं नाव! ईशान किशनची गर्लफ्रेंड आहे कोट्यवधींच्या ब्रँडची मालकीन

2029 च्या आयपीएल फायनलमध्ये अदिती पहिल्यांदा ईशानला सपोर्ट करताना कॅमेऱ्यात कैद झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ishan kishan Girlfriend Aditi Hundia: टी 20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 77 धावांची झंझावाती खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून देणारा ईशान किशन सध्या चर्चेत आहे. मात्र, या यशासोबतच त्याच्या खासगी आयुष्यातील एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ईशानच्या आजोबांनी अदिती हुंडिया आणि ईशान हे लग्न करणार असल्याचचं एक प्रकारे जाहीर केलं आहे. इशांतची होणारी बायको  ही जयपूरची सुकन्या केवळ एक मॉडेल नसून एक यशस्वी 'बिझनेस वुमन' असल्याचे समोर आले आहे.

अदितीचे वडील ललित हुंडिया हे व्यावसायिक असून, तिने जयपूरच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. 2017 मध्ये तिने 'फेमिना मिस इंडिया राजस्थान' आणि 2018 मध्ये 'मिस सुपरनॅशनल इंडिया'चा किताब पटकावला होता. पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Advertisement

नक्की वाचा - IND vs PAK: 'तो' 10 ओव्हर खेळला तर सामना संपलाच समजा' 'या' खेळाडूची शोएब अख्तरलाही धडकी

ग्लॅमर विश्वात नाव कमावल्यानंतर अदितीने उद्योजकतेकडे पाऊल वळवले. नोव्हेंबर 2021 मध्ये तिने केवळ दोन व्यक्तींच्या मदतीने 'अदिति हुंडिया' हा स्वतःचा क्लोथिंग ब्रँड सुरू केला. तब्बल 27 महिन्यांच्या संघर्षानंतर तिला 1 लाख रुपयांची पहिली मोठी ऑर्डर मिळाली होती. आज या ब्रँडची उलाढाल कोट्यवधींमध्ये असून अदितीने स्वतःच्या हिमतीवर हे साम्राज्य उभे केले आहे.

नक्की वाचा - IND vs PAK: पाकिस्तानी 'मिस्ट्री' स्पिनर उस्मान तारिकला कसं रोखायचं? अश्विनने सांगितला जालीम उपाय

अदितीने आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला तिला मोठी ऑर्डर मिळवण्यासाठी सवा दोन वर्षे वाट पाहावी लागली. पण जिद्द न सोडता तिने काम सुरू ठेवले. आज ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून तिचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मॉडेलिंग, म्युझिक अल्बम आणि स्वतःचा व्यवसाय यातून ती करोडोंची कमाई करते.

नक्की वाचा - T20 World Cup दरम्यान व्हायरल होणारी ही सुंदरी कोण? AI की...; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

2029 च्या आयपीएल फायनलमध्ये अदिती पहिल्यांदा ईशानला सपोर्ट करताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. तेव्हापासून या दोघांच्या जोडीची चर्चा रंगली होती. आता ईशानच्या कुटुंबानेही या नात्याला होकार दिल्याने लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते नक्की कधी लग्न बंधनात अडकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवाय सध्या इशांत यशाच्या शिखरावर आहे.