Ind W vs Pak W Today Match Update : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघ पाकिस्तान विरोधात भिडणार आहे.आयसीसी महिला विश्वकपचा सहावा सामना आज रविवारी दुपारी तीन वाजता भारत आणि पाकिस्तान (महिला संघ) यांच्यात कोलंबो येथे रंगणार आहे. तत्पूर्वी,पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सनाने मोठं विधान केलं आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करून रेकॉर्ड मोडणार असल्याचं सनाने म्हटलं आहे. महिला वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तान भारतापासून 0-11 ने पिछाडीवर आहे.
पण फातिमाने म्हटलंय की, त्यांचा संघ भूतकाळाचा विचार करणार नाही, तर वर्तमानावर फोकस करणार आहे. फातिमाने सामन्याच्या एक दिवस आधी माध्यमांशी बोलताना म्हटलंय, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जे कोणतेही रेकॉर्ड बनले आहेत, ते मोडण्यासाठी बनले आहेत. पाकिस्तान कधीच भारताला हरवू शकत नाही, असं नाही. आमच्या समोर कोणताही संघ असल्यावर आम्ही चांगलं क्रिकेट खेळण्याचा विचार करतो. आम्ही मागच्या रेकॉर्डबाबत विचार करणार नाहीत. फक्त त्या सामन्याच्या दिवसाचा विचार करू.
नक्की वाचा >> कप सिरपमुळे 11 लहान मुलांचा मृत्यू! पोलिसांनी डॉक्टरला केली अटक, धक्कादायक माहिती समोर
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना नेमकं काय म्हणाली?
फातिमा सनाने म्हटलं, मला वैयक्तिकरित्या वाटतं की,जर पाकिस्तान चांगलं खेळला, तर आमच्याकडे कोणत्याही मोठ्या संघाला पराभूत करण्याचं कौशल्य आहे. तुम्ही एक सामन्याच्या आधारावर स्वत:चं मूल्यमापन करू शकत नाहीत. संघाचं मोनबलं मोठं आहे.आमचं मेन टार्गेट चांगली कामगिरी करणं आहे. आमचे अन्य संघांसोबत चांगले संबंध आहेत.
आम्ही खेळाडू वृत्ती जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आधी जे काही झालं आहे, त्या गोष्टी आम्हाला पसंत आहेत. पण आता आम्हाला खेळावर फोकस करायचं आहे. हा एक दबावाचा सामना आहे. आम्हाला माहितीय की, भारत-पाकिस्तान सामना संपूर्ण जग पाहतो. पण त्या दबावाला सांभाळणं हीच खरी कसोटी आहे. आम्ही आमच्या रणनीतीवर फोकस करू आणि त्यानुसार जिंकण्याचा प्रयत्न करू.
नक्की वाचा >> बाईईई..हा काय प्रकार! दसऱ्याला सोनं खरेदीत 25 टक्क्यांनी झाली घट, मुंबईत आज 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं
पाकिस्तानचा बांगालदेश विरुद्ध झालेल्या सामन्यात सात विकेट्सने पराभव झाला होता. पण फातिमाचं म्हणणं आहे की, संघाचं मनोबल भक्कम आहे. संघाच्या सर्व प्रशिक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे.एका सामन्यातून संपूर्ण टूर्नामेंटचं गणित आखता येत नाही. आम्हाला अजूनही विश्वास आहे की, आम्ही सामना जिंकू शकतो, असंही सना म्हणाली.