Ind Vs Aus: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीमधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला बाहेर ठेवण्यात आल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा होत आहेत. रोहित शर्माच्या खराब फॉर्मवरुन त्याच्यावर टीका होत असून तो लवकरच निवृत्ती घेणार असल्याचं बोललं जात आहे. या निवृत्तीच्या आणि खराब फॉर्मच्या चर्चांवरुन आता रोहित शर्माने चांगलेच खडेबोल सुनावले असून मी रियाटरमेंट घेणार नसल्याचे म्हणत टिकाकारांना प्रत्यूत्तर दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला रोहित शर्मा?
इतक्या लांबून मी काय फक्त बसायला आलोय का ? मला सामने खेळायचेत आणि मला सामने जिंकूनही द्यायचेत. 2007 साली जेव्हा मी पहिल्यांदा ड्रेसिंगरुममध्ये आलो होतो तेव्हाही माझ्या मनात हेच होतं की मॅज जिंकायचीय. टीमची गरज काय आहे हे तुम्हाला समजणे गरजेचे असते. संघाबाहेर बसण्याचा निर्णय म्हणजे निवृत्तीचा निर्णय नाहीये. आणि मी गेममधून हटणारही नाहीये, अशा शब्दात रोहित शर्माने टीकाकारांना ठणकावले.
तसेच कोणीतरी एक माणूस लॅपटॉप घेऊन बसलाय, माईक घेऊन बसलाय आणि पेन घेऊन बसलाय. ते काय लिहितात आणि बोलतात यामुळे आमचे जीवन बदलत नाही. ही लोकं ठरवू शकत नाही की आम्ही कधी जावं, आम्ही कधी खेळू नये किंवा आम्ही कधी बाहेर बसावे आणि आम्ही कधी संघ नेतृत्व करावे. मी सेन्सिबल, विचारी माणूस आहे. दोन मुलांचा बाप आहे. मला थोडंसं डोकं आहे आणि आयुष्यात मला काय करायचंय हे मला माहिती आहे. असंही रोहित शर्मा यावेळी म्हणाला.
( HMPV : चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या व्हायरसची एन्ट्री? हॉस्पिटलमध्ये रांगा, वाचा लक्षणं आणि उपाय )
यावेळी बोलताना रोहित शर्माने बदली कर्णधार जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले. ज्याप्रमाणे बुमराहने कामगिरी केली आहे ते पाहता त्याने एक दर्जा निर्माण केला आहे. २०१३ मध्ये जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या कामगिरीचा आलेख खरोखरच उंचावला आहे. अशा शब्दात त्याने बुमराहचे कौतुक केले.
Pimpri Chinchwad: मुलीला सांभाळा, मला भट्टीमध्ये जाळा... व्हिडिओ करत रिक्षा चालकाने आयुष्य संपवलं