2 months ago

IPL 2026, RCB vs GT Final Highlights: आयपीएल 2026 चा फायनल सामन्याच्या थरार आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा महामुकाबला झाला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 155 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आरसीबीपुढे विजयासाठी 156 धावांचं आव्हान होतं. परंतु, आरसीबीच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी करत गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करून अर्धशतकी खेळी केली. विराट कोहलीने 42 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. या धावांच्या जोरावर आरसीबीने 18 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 161 धावा केल्या आणि या फायनलच्या सामन्यात आरसीबीचा दणदणीत विजय झाला.

May 31, 2026 23:02 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: विराट कोहलीचं दमदार अर्धशतक

RCB vs GT IPL Final Live : आरसीबी आयपीएल 2026 चा फायनल सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत विराट कोहलीने दमदार अर्धशतक ठोकलं. 15 षटकानंतर आरसीबीची धावसंख्या 139-5 वर पोहोचली आहे. विराट कोहली आणि टीम डेव्हिड सावध खेळी करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेत आहेत.

May 31, 2026 22:37 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: राशिद खानने एकाच षटकात घेतल्या 2 विकेट

RCB vs GT IPL Final Live : कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर व्यंकटेश 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पड्डीकलही फक्त एक धाव करून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारही स्वस्तात माघारी परतला. राशिद खानने पाटीदारला 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर राशिद खानच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्याही फक्त एक धाव करून तंबूत परतला. 13 षटकानंतर आरसीबीची धावसंख्या 126-4 वर पोहोचली आहे.

Advertisement
May 31, 2026 22:21 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: पॉवर प्ले मध्ये आरसीबीचा धमाका, पण 2 फलंदाज माघारी

 RCB vs GT IPL Final Live: 156 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यरने धावांचा पाऊस पाडला. परंतु, कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर व्यंकटेश 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पड्डीकलही फक्त एक धाव करून माघारी परतला. आठ षटकानंतर आरसीबीची धावसंख्या 2 बाद 88 वर पोहोचली आहे.

May 31, 2026 21:53 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: टार्गेट गाठण्यासाठी आरसीबीचे फलंदाज उतरले मैदानात

RCB vs GT IPL Final Live : गुजरात टायटन्सने 20 षटकांत 8 बाद 155 धावा केल्या. त्यानंतर 156 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर मैदानात उतरले आहेत. 4 षटकांत आरसीबीच्या बिनबाद 55 धावा झाल्या आहेत. विराट कोहलीने कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार षटकारांचा पाऊस पाडला.

May 31, 2026 21:22 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: वॉशिंग्टन सुंदरचं दमदार अर्धशतक, आरसीबीपुढे 156 धावांचं आव्हान

RCB vs GT IPL Final Live : आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्स संघाची पुरती दाणादाण उडाली. सुरुवातीच्या षटकांपासूनच गुजरातचे धुरंधर फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले. परंतु,वॉशिंग्टन सुंदरने जीवदान मिळाल्यानंतर अप्रतिम फलंदाजी करून संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. सुंदरने 37 चेंडूत 50 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे आरसीबीपुढे 156 धावांचं आव्हान असणार आहे. गुजरातने 20 षटकांत 8 बाद 155 धावांपर्यंत मजल मारली. 

May 31, 2026 21:02 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: 17 षटकानंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या किती?

 RCB vs GT IPL Final Live : ओव्हर्सच्या शेवटच्या टप्प्यातही गुजरात टायटन्स संघाची दाणादाण उडाली आहे. राहुल तेवतिया बाद झाल्यानंतर गुजरात संघाच्या धावसंख्येची गती मंदावली आहे. सतरा षटकानंतर गुजरातची धावसंख्या 121-6 वर पोहोचली आहे.

Advertisement
May 31, 2026 20:42 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: 13 व्या षटकात जॉस बटलर झाला बाद

RCB vs GT IPL Final Live : गुजरात टायटन्सचा बॉस म्हणून ओळखला जाणारा फलंदाज जॉस बटलर कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. बटलर 19 धावांवर बाद झाला. त्यामुळे गुजरातच्या धावसंख्येला ब्रेक लागला असून 14 षटकानंतर गुजरातची धावसंख्या 99-4 झाली आहे. आरसीबीचा स्टार गोलंदाज जॉश हेजलवूडने गुजरातचा फलंदाज अर्शद खानला 15 धावांवर बाद केलं. पंधरा षटकानंतर गुजरातच्या संघाची धावसंख्या 105-5 अशी आहे. 

May 31, 2026 20:22 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: गुजरात टायटन्सचे तीन फलंदाज बाद

RCB vs GT IPL Final Live  : गुजरातचे सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन बाद झाल्यानंतर निशांत सिंधू 20 धावांवर झेलबाद झाला. रसिक सलाम दारने सिंधूला बाद केलं. त्यामुळे गुजरातच्या संघाची कमान आता जॉस बटलरच्या खांद्यावर आहे. 11 षटकानंतर गुजरातची धावसंख्या 68-3 वर पोहोचली आहे.

Advertisement
May 31, 2026 19:57 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates: गुजरातचे सलामीवीर स्वस्तात माघारी

RCB vs GT IPL Final Live : गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल 10 धावांवर झेलबाद झाल्यानंतर साई सुदर्शनही तंबूत परतला.भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर साई 12 धावांवर झेलबाद झाला. 6 षटकानंतर गुजरातची धावसंख्या 46-2 अशी झाली आहे.

May 31, 2026 19:49 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates :शुबमन गिल 10 धावांवर बाद

RCB vs GT IPL Final Live  : गुजरात टायटन्सने पहिल्या दोन षटकांमध्ये दमदार सुरुवाती केली होती. पंरतु,जॉस हेजलवूडच्या तिसऱ्या षटकात शुबमन गिल 10 धावांवर झेलबाद झाला आणि गुजरात टायटन्सा मोठा धक्का बसला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने शुबमनची अप्रतिम कॅच घेतली. तीन षटकानंतर गुजरातची धावसंख्या एक बाद 24 वर पोहोचली आहे.

May 31, 2026 19:40 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates : गुजरात टायटन्सची दमदार सुरूवात

RCB vs GT IPL Final Live  : गुजरात टायटन्सने पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात केली आहे. कर्णधार शुबमन गिल आणि सलामीवीर साई सुदर्शन फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. दोन षटकानंतर गुजरातची धावसंख्या बिनबाद 18 वर पोहोचली आहे.

May 31, 2026 19:09 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates : आरसीबीची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी

RCB vs GT IPL Final Live: आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात नाणेफेकीचा कौल पार पडला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ थोड्याच वेळात मैदानात फलंदाजीसाठी उतरणार आहे. गुजरातने नाणेफेक जिंकली असती,तर प्रथम फलंदाजीच करण्याचा निर्णय घेतला असता, असं गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने म्हटलं.

May 31, 2026 18:51 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates : थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल

RCB vs GT IPL Final Live Updates : आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्या थोड्याच वेळात फायनलचा थरार सुरु होणार आहे. तत्पूर्वी क्रिकेटप्रेमींच्या नजरा नाणेफेकीच्या कौलवर रंगल्या आहेत. नाणेफेक काही मिनिटांतच होणार आहे.

May 31, 2026 18:12 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates :स्टेडियमबाहेर आरसीबीच्या चाहत्यांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल

RCB vs GT IPL Final Live Updates : आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. दोन्ही संघ या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच आरसीबी आणि विराट कोहलीच्या चाहत्यांनी स्टेडियमच्या दिशेन कुच केली आहे. सामना सुरु होण्याआधीच आरसीबीचे चाहते विराट कोहली आणि टीमला ऑल द बेस्ट देताना दिसत आहेत.

May 31, 2026 17:53 (IST)

RCB vs GT IPL Final Live Updates : फायनलचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल?

RCB vs GT IPL Final Live : क्वालिफायर 1,एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 शिवाय, बीसीसीआयने फायनलसाठी एक रिझर्व्ह डे ठेवला आहे. म्हणजेच जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर हा सामना सोमवारी त्याच स्कोअरकार्डनुसार पुढे सुरु केला जाईल. ज्या ओव्हरपासून सामना थांबला होता, तिथूनच सामना पुढे खेळवला जाईल.