Indian Cricketer Inside Story : 1989 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर कराची टेस्टमध्ये सचिन तेंडुकरसोबत डेब्यु केलं. क्रिकेट करिअरमध्ये एक टेस्ट आणि 20 एकदिवसीय सामने खेळले. ते 1996 मध्ये वर्ल्डकप टीमचा भागही होते. पण दुखापतीमुळे त्यांच्या करिअरला ब्रेक लागला आणि 28 वयातच त्यांनी क्रिकेटला बायबाय केलं. भारतीय क्रिकेटचा वेगवान गोलंदाज सलील अंकोल असं त्यांच नावं..क्रिकेट सोडल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. पण एका धक्क्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.
सलिल अंकोल यांनी अनेक टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये सीआयडी, कहता है दिल, कोरा कागज आणि शशश..कोई है, अशा टीव्ही शोजचा समावेश आहे. चित्रपटातही ते झळकले. वर्ष 2000 मध्ये संजय दत्त स्टारर फिल्म कुरुक्षेत्र मध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. याशिवास पिताह, चुरा लिया है तुमने आणि सायलेन्स प्लिझ..द ड्रेसिंग रूम सारख्या चित्रपटातही काम केलं आहे.2006 मध्ये त्यांनी सलमान खानच्या रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस मध्येही भाग घेतला होता.
नक्की वाचा >> भाजपचे नगरसेवक असलेले नवरा बायको अडचणीत, 40 महिला जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकल्या, नेमकं प्रकरण काय?
कुटुंबीयांनी आणि मित्रांनी अनेकदा समजावलं, पण..
क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर सलिल यांना वैयक्तिक जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. 1997 मध्ये त्यांचा क्रिकेट करिअरचा द एन्ड झाला.1999 ते 2011 पर्यंत त्यांचं जीवन दारूच्या व्यसनात बुडालं. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, सुरुवातीला त्यांना दारू पिणं सामान्य वाटायचं.पण काही काळानंतर ते दारुच्या व्यसनात पूर्णपणे बुडाले. त्यांनी क्रिकेट सामनेही पाहणे बंद केले.कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्यांना अनेकदा समजावलं. पण त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही.सलिल अनेकदा रिहॅब सेंटरमध्ये गेले. पण त्यांचं व्यसन सुटलं नाही.
नक्की वाचा >> Akola News: अकोला हादरलं! तीन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू,मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ, काय घडलं?
वर्ष 2011 मध्ये रिहॅबच्या वेळी त्यांनी वर्ल्डकप पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक सुरुवात झाली. त्यांनी म्हटलं की,दारू पिणं व्यसन नाही, तर एक आजार आहे. जर वेळेवर उपाय आणि कुटुंबीयांची साथ मिळाली नसती,तर ते आज जीवंत नसते. वर्ष 2014 पर्यंत त्यांचं आरोग्य इतकं खराब झालं की, ते 12 वेळा आयसीयूत भरती झाले होते. दरम्यान, आज सलिल चांगलं जीवन जगत असून ते सध्या मुंबईच्या क्रिकेट संघाशी जोडले गेले आहेत. ते मुंबई संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यरत होते.त्यांनी जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2024 पर्यंत भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे निवडकर्ता म्हणूनही काम केलं आहे.