Sanju Samson Flying Catch Viral Video : आशिया कप 2025 च्या फायनलचा थरार दुबई आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट स्टेडियममध्ये रंगत आहे. टीम इंडीयाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी केली.वादग्रस्त गन सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानने 38 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. तर फखर झमाननेही 35 चेंडूत 46 धावांपर्यंत मजल मारली.
पण वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने या दोन्ही फलंदाजांना गुंडाळलं आणि पाकिस्तानच्या धावसंख्येला ब्रेक लावला. दरम्यान, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर भारताचा विकेटकीपर संजू सॅमसनने हवेत उडी मारून पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघाचा अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे सलमानला फक्त 8 धावा करून तंबूत परतावं लागलं. संजूच्या या जबरदस्त झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इथे पाहा संजू सॅमसनने सलमानचा घेतलेल्या जबरदस्त झेलचा व्हिडीओ
भारताने पाकिस्तानला 146 धावांवर गुंडाळलं
साहिबजादा आणि फखरने सुरुवातीच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी मिडल ऑर्डरच्या फलंदाजांची नांगी ठेचली. मोहम्मह हारिस, सलमान अघा, हुसैन तलत,मोहम्मद नवाझ, शाहिन आफ्रिदी, फशिम, हारिसह अब्रारला 10 धावाही करता आल्या नाहीत. त्यामुळे भारतापुढे आशिया कपची फायनल जिंकण्यासाठी 147 धावांचं आव्हान असणार आहे. भारतासाठी जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कुलदीपने फिरकीची जादू दाखवत पाकिस्तानच्या 4 फलंदाजांना बाद केलं.