Smriti Mandhana Latest Instagram Video : स्मृती मंधाना-पलाश मुच्छलचं लग्न कधी होणार? या दोघांचं लग्न पुढे ढकललं की रद्द झालं? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.स्मृती-पलाशच्या लग्नाबाबत इंटरनेटवर अनेक उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.अशातच स्मृती मंधानाची लग्नसोहळ्यानंतरची पहिली पोस्ट व्हायरल होत आहे. स्मृती मंधानाने एका ब्रँडसोबतच्या कोलॅबोरेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे . या व्हिडीओत महिला वर्ल्ड कप 2025 चे सेमीफायनल आणि फायनलमधील विजयी क्षण दाखवण्यात आले आहेत. स्मृतीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, "विजयी क्षण,प्रमाणिक संवाद आणि दैनंदिन नित्यक्रम..जे पूर्णपणे गेम चेंजर आहेत".
पलाश मुच्छलसोबतची लग्नाची तारीख पुढे ढकलल्यानंतर स्मृतीने इन्स्टाग्रामवर पहिल्यांदाच व्हिडीओ शेअर केलाय. यावेळी स्मृतीच्या हाताकडे चाहत्यांनी लक्ष वेधलं. त्याचं कारणही तितकच खास होतं. म्हणजेच, स्मृतीने तिच्या हातात एंगेजमेंट रिंग होती की नाही?असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण स्मृतीच्या हातात एंगेजमेंट रिंग दिसत नव्हती.परंतु, हा व्हिडीओ स्मृतीच्या साखरपुड्याआधीच शूट केला आहे, असा दावा केला जात आहे.
स्मृती मंधानाने पलाश मुच्छलसोबतच्या त्या पोस्ट केल्या डिलीट
स्मृतीच्या लग्नाच्या दिवशीच तिचे वडील श्रीनिवास यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे भारतीय महिला संघातील या दिग्गज क्रिकेटपटूची आणि संगीतकार पलाश मुच्छल यांची लग्नाची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.मंधाना आणि पलाश यांचे लग्न रविवारी (23 नोव्हेंबर) रोजी होणार होते.परंतु, श्रीनिवास यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे लग्न पार पडलं नाही. विशेष म्हणजे, स्मृती मंधानाने संगीतकार पलाश मुच्छलसोबतच्या लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनशी संबंधित सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्या. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.
नक्की वाचा >> Video: सिगारेटच्या लायटरने अगरबत्ती-दिवा पेटवायचा की नाही? भक्ताच्या प्रश्नावर अनिरुद्धाचार्यांचं भन्नाट उत्तर
इथे पाहा स्मृती मंधानाचा लेटेस्ट व्हिडीओ
खरंतर हा व्हिडिओ तिच्या संघातील सहकारी आणि जवळच्या मैत्रिणी जेमिमा रॉड्रिग्जने शेअर केला होता.पण आता तो व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिसत नाहीय.या व्हिडिओला दहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाले होते. पलाशची बहीण पलकने एक छोटा संदेश शेअर करून अटकळींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता आणि सांगितले होते की. लग्न फक्त होणाऱ्या वधूच्या वडिलांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे.