स्मृती मंधानाच्या आईनं पलाश मुच्छलला Instagram वर डिवचलं, काही वेळात पोस्ट डिलिट केली, पण स्क्रिनशॉट व्हायरल

स्मृती मंधानाच्या आईने इन्स्टाग्रामवर एक भन्नाट मिम शेअर केली होती. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व गोलंदाजांना पलाशचा चेहरा लावला होता. ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियांचा वर्षाव केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Smriti Mandhana Mother Post Viral

Smriti Mandhana vs Palash Muchhal : वुमन्स प्रीमियर लीग (WPL) च्या फायनलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्स राखून पराभव करत जेतेपद पटकावलं. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना या विजयाची शिल्पकार ठरली. स्मृती मंधानाने 41 चेंडूत 87 धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे स्मृतीला वुमन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे सामन्याच्या आदल्या दिवशी स्मृतीला प्रचंड ताप होता. तरीही तिने अप्रतिम खेळी करून आरसीबीला विजय मिळवून दिला. त्यानंतर आरसीबीसह त्यांच्या चाहत्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. पण स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत एक पोस्ट शेअर करून त्याला चांगलच डिवचलं. 

त्या स्क्रिनशॉटने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

स्मृती मंधानाच्या आईने इन्स्टाग्रामवर एक भन्नाट मिम शेअर केली होती. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व गोलंदाजांना पलाशचा चेहरा लावला होता. ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियांचा वर्षाव केला. काही वेळानंतर स्मृतीच्या आईने ती पोस्ट डिलिट केली. पण तोपर्यंत या पोस्टचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

नक्की वाचा >> Mumbai-Goa Traffic Jam: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, 4-5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा..काय घडलंय?

स्मृतीच्या 87 धावांच्या दमदार खेळीनं आरसीबीला विजयाच्या शिखरावर पोहोचवलं आणि आरसीबी वुमन्स प्रिमिअर लीगमध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरली. स्मृतीसाठी हा विजय खूप खास आहे. कारण मागील काही दिवसांपासून स्मृतीच्या जीवनात अनेक चढ-उतार आल्याचं पाहायला मिळालं. पलाश मुच्छल आणि स्मृतीचं लग्न मोडल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये दु:खाची लाट पसरली होती. काहींनी तर पलाशवर जोरदार टीकाही केली होती. परंतु, स्मृतीच्या आईनं पलाशबाबत केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

Advertisement