गौतम गंभीरला गाशा गुंडाळावा लागणार? प्रशिक्षकपदावरून होणार उचलबांगडी? सौरव गांगुलीचं 'ते' विधान खूप चर्चेत

कोलकाताच्या ईडन गार्डनर मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sourav Ganguly vs Gautam Gambhir
मुंबई:

Sourav Ganguly On Gautam Gambhir :  कोलकाताच्या ईडन गार्डनर मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठी प्रतिक्रिया दिलीय. गांगुलीने भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरलाही महत्त्वाचा सल्ला दिला आहे.यावेळी गांगुलीने बीसीसीआयला महत्त्वाची सूचना देत म्हटलंय की, सामना सुरू होण्याच्या चार दिवस आधी बीसीसीआयच्या क्युरेटरने येथे येऊन पिचवर ताबा मिळवला होता.

इंडिया टुडेशी बोलताना गांगुलीला विचारण्यात आलं होतं की, खेळपट्टीचा अंदाज घेण्याआधी भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांचं (सौरव गांगुली)चं मत जाणून घेतलं होतं का?,यावर उत्तर देताना गांगुलीने म्हटलंय, "बीसीसीआयचे क्युरेटर टेस्ट सामन्याच्या चार दिवस आधी येऊन  खेळपट्टीची देखभाल करतात.आमच्याकडे स्वत:चे क्युरेटर (सूजन मुखर्जी) हे सुद्धा आहेत. ज्यांनी दिर्घकाळ उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गांगुलीने पुढे म्हटलं, भारतीय संघाची टॉप आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगलं क्रिकेट खेळू शकतात. ईडन गार्डनमध्ये त्या तिन्ही दिवस संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलं होतं. मला वाटतं की, गौतम गंभीर आणि त्यांची भारतीय टीम ईडन गार्डन्सच्या तुलनेत चांगल्या विकेट्सवर खेळेल.

नक्की वाचा >> 32 चेंडू..318 चा स्ट्राईक रेट, 10 चौकार अन् 9 षटकार, वैभव सूर्यवंशीने ठोकलं वादळी शतक! गगनचुंबी सिक्सरचा Video

'प्रशिक्षकपदावरून हटवणं हा उपाय नाही'

गौतम गंभीरला खराब रेकॉर्डमुळे प्रशिक्षकपदावरून हटवलं पाहिजे का? या प्रश्नाचं उत्तर देत गांगुली म्हणाला,गौतमने कोच म्हणून आणि शुबमनने कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. मला ठामपणे वाटतंय की, भारतातही चांगली कामगिरी करू शकतात. गंभीरला प्रशिक्षकपदावरून हटवणं हा उपाय नाहीय. आम्हाला चांगल्या खेळपट्टीवर खेळण्याची आवश्यकता आहे.माजी कर्णधार पुढे म्हणाला, "आता या टप्प्यावर असे निर्णय घेण्याची गरज नाही. संघाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे, टेस्ट सामना जिंकण्यासाठी एकत्र मेहनत करण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की पुढे भारतीय संघ चांगल्या रणनीतीसह खेळेल."भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील टेस्ट मालिकेचा दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे.