Asia Cup 2025: पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबरपर्यंत चालेल. भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी यजमान यूएई विरुद्ध पहिला सामना खेळेल. या स्पर्धेचा हा 17 वा हंगाम असेल, ज्यामध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील. भारत आणि पाकिस्तान हे या स्पर्धेतील दोन प्रमुख संघ असतील. 14 सप्टेंबर रोजी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येतील, ज्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये खूप उत्साह आहे.
Vaseline मुळे भारतीय संघ ओव्हल कसोटी जिंकला! पाकिस्तानी क्रिकेटपटूचा खुळचट आरोप
तत्पुर्वी, आशिया कप 2025 च्या आधी भारतीय चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav latest Updates) याचे काही काळापूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झाले होते, त्यानंतर आशिया कप संघात त्याच्या स्थानाबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नव्हते, परंतु आता कर्णधार सूर्यकुमार यादवने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकताच सूर्यकुमार मैदानावर फलंदाजीचा सराव करत असल्याचा फोटो समोर आला आहे, त्यानंतर आशिया कप संघात त्याचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा दिसत आहे.
यावेळी ही आशिया कप टी-20 स्वरूपात खेळला जाईल, ज्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा खूप महत्त्वाची मानली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. या महिन्याच्या अखेरीस टीम इंडियाच्या संघाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा: कसोटी सामना भारताने जिंकला, पण मनं मात्र क्रिस वोक्सच्या एक कृतीने जिंकली, पाहा VIDEO )