- टी-20 विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे
- वेस्ट इंडिजचा नेट रनरेट भारताच्या तुलनेत अधिक असल्याने पावसामुळे सामना रद्द झाल्यास त्यांना फायदा होईल
- भारत आणि वेस्ट इंडिजकडे सध्या समान गुण असून नेट रनरेटनुसार सेमीफायनलसाठी वेस्ट इंडिज पुढे आहे
Team India T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत झिम्बाब्वेवर विजय मिळवूनही भारतीय संघासमोर उपांत्य फेरीचे (Semi-final) आव्हान अद्याप कायम आहे.भारताला आपला शेवटचा सामना करो या मरो या प्रमाणे आहे. टीम इंडिया सुपर 8 मध्ये वेस्टइंडीय विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल त्याला सेमीफायनलचं तिकीट मिळणार हे नक्की आहे. मात्र, यावेळी जर पाऊस झाला तर काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर वेस्ट इंडिजविरुद्धचा आगामी सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर भारताचे का होणार हे आपण जाणून घेणार आहोत. अशा वेळी नेट रनरेट महत्वाचा ठरणार आहे.
सध्याच्या गुणतालिकेचा विचार करता, भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांकडे 2 सामन्यांत प्रत्येकी 2 गुण आहेत. मात्र, नेट रनरेटच्या बाबतीत वेस्ट इंडिज (+1.791) भारतापेक्षा (-0.100) खूप पुढे आहे. वेस्ट इंडिजचा नेट रनरेट भारतापेक्षा कित्येक पटीने चांगला आहे. जर मॅच रद्द झाली, तर दोन्ही टीमला समान 3-3 गुण मिळतील. पण रनरेटच्या जोरावर वेस्ट इंडिज सेमीफायनलचे तिकीट बुक करेल आणि भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा येईल. त्यामुळे उद्याच्या सामन्यात पाऊस होवू नये अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमी करत आहेत. तशी प्रार्थना ही ते करत आहेत.
सध्या तरी कोलकातामध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचे 'AccuWeather' ने म्हटले आहे. पण क्रिकेटमध्ये आणि हवामानात काहीही होऊ शकते, त्यामुळे भारतीय चाहते आता पावसापेक्षा 'सूर्यप्रकाशा' साठी जास्त प्रार्थना करत आहेत. जर भारत-वेस्ट इंडिज सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल. अशा स्थितीत दोन्ही संघांचे प्रत्येकी 3 गुण होतील. नियमानुसार, गुण समान असल्यास ज्या संघाचा नेट रनरेट सरस असेल, तो संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. वेस्ट इंडिजचा रनरेट अधिक असल्याने भारत स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल.
का आहे हा सामना महत्त्वाचा?
- समान गुण: भारत आणि वेस्ट इंडिज या दोघांकडे 2-2 गुण आहेत.
- रनरेटचा फरक: वेस्ट इंडिजचा रनरेट +1.791 आहे, तर भारताचा -0.100 आहे.
- रद्द झाल्यास नुकसान: सामना रद्द झाल्यास गुण विभागले जातील, ज्याचा थेट फायदा वेस्ट इंडिजला होईल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता कमी आहे. तरी पावसाने हजेरी लावल्यास भारताचे गणित पूर्णपणे बिघडू शकते.मात्र असं असलं तरी टिम इंडीयाने पुर्ण ताकदीने मैदानात उतरवण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या क्रिकेट चाहत्याचं मोठं दडपण असेल. जर भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर वेस्ट विंडीज विरुद्धचा सामना काही करून जिंकावा लागणार आहे. सध्या दोन्ही संघ फार्मात आहेत. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार हे निश्चित आहे. दक्षिण अफ्रीकेने सेमीफायनलचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. त्यांचा शेवटचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध आहे.