Jemimah Rodrigues On Smriti Mandhana : देशाची महिला स्टार क्रिकेटर स्मृती मंधानाचं लग्न पलाश मुच्छलसोबत 23 नोव्हेंबरला पार पडणार होतं. या लग्नसोहळ्याआधी स्मृती-पलाशने हळदी आणि मेहंदी समारंभात धमाल केली होती.परंतु, लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाबाबत उलटसुलट चर्चाही रंगल्या. लग्न पुढे ढकललं आणि मोडलं?असा ट्रेंडच इंटरनेटवर सुरु झाला. स्मृतीच्या या वाईट काळात तिची सहकारी आणि अत्यंत जीवलग मैत्रिण जेमिमा रॉड्रिग्जने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
स्मृती मंधानासाठी जेमिमाने घेतला 'हा' मोठा निर्णय
रॉड्रिग्स बिग बॅश लीगच्या सुरू असलेल्या हंगामात ब्रिस्बेन हीट या संघाचा भाग होती. मात्र तिने स्पर्धा अर्धवट सोडून मंधानाच्या लग्नाला येण्याचा निर्णय घेतला होता. आता मंधानाचे लग्न पुढे ढकलले गेले असले तरी तिने मंधानासोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.डब्ल्यूबीबीएल फ्रँचायझीनेही तिच्या या निर्णयाचा आदर केला आहे.त्यांनी जेमिमाला तिच्या मैत्रिणीसाठी स्पर्धेतील उर्वरित सामन्यांपासून दूर राहण्याची परवानगी दिली आहे.
मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका
स्मृती मंधानाच्या वडिलांना तिच्या लग्नाच्याच दिवशी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं.लग्नाच्या काही दिवस आधीच मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता.त्यानंतर त्यांना सांगली येथील सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले. हीच मुख्य कारणे आहेत, ज्यामुळे मंधाना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
स्मृती मंधानाच्या हळदी समारंभात जेमिमा रॉड्रिग्ज तुफान नाचली
मिळालेल्या माहितीनुसार मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांची प्रकृती आता ठीक आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आता मुंबईला परत आले आहेत. ते विश्रांती घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारण होत असल्याचं समजते.