Top-3 Batters: ना सचिन ना लारा! सूर्याने जगातल्या 3 टॉप क्रिकेटरमध्ये कोणाला दिली जागा

क्रिकेटमधील आपल्या टॉप तीन क्रिकेटरची नावे सूर्यकुमार यादव याने जाहीर केली आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Suryakumar Yadav Birthday: सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav on Top-3 Batters) याने क्रिकेटमधील आपल्या टॉप तीन क्रिकेटरची नावे जाहीर केली आहेत. सूर्याने सचिन तेंडुलकर आपला आदर्श आहे असे सांगितले आहे. असं असलं तरी त्याने सचिनला आपल्या टॉप तीनमध्ये जागा दिलेली नाही हे विशेष. शिवाय राशिद खानच्या बॉलिंगवर खेळायला मजा येते असंही तो म्हणाला आहे. त्याने आपले टॉप तिन क्रिकेटरची नावे सांगताना पहिले नाव हे एम.एस धोनीचे घेतले आहे. त्यानंतरचा क्रमांक रोहित शर्माला दिला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीला ठेवले आहे. तो म्हणतो भारतासाठी ज्या दिवशी खेळलो तो दिवस आपल्यासाठी सर्वात कधीही न विसरता येणारा दिवस आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 सूर्यकुमार यादव याची ओळख म्हणजे 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू म्हणून आहे. बॅटींग करताना सूर्या असे काही फटके मारतो की गोलदाजां बरोबरच त्याच्या चाहत्यांनाही तो हैराण करून टाकतो. सूर्याने टी-20 मध्ये आपली विशेष छाप पाडली आहे. त्याने या प्रकारात आतापर्यंत चार पेक्षा जास्त शतकं लगावली आहेत. असं करणारा तो जगातला तिसरा बॅट्समन आहे. टी 20 मध्ये सूर्याने जवळपास सोळा वेळा प्लेयर ऑफ द मैच हा पुरस्कार मिळवला आहे. विराट कोहली आणि मलेशियाच्या वीरनदीप यांनीही ऐवढ्याच वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - NDTV मराठीचा दणका! अखेर त्या सातबाऱ्यावरचे 'पाकिस्तान' हे नाव हटवले

सूर्यकुमार यादव भारताचा टी-20 क्रिकेट संघाचा कॅप्टन आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंके विरोधात टी 20 मालिका जिंकली होती. टी-20 चा विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर टी 20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादववर देण्यात आली होती. सूर्या हा टी 20 चा बादशहा आहे, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम आक्रम याने केले होते. शिवाय त्याला गोलंदाजी करणे अवघड असल्याचेही ते म्हणाले होते