Vaibhav Suryavanshi: इंग्लंडच्या न्यूज पेपरमध्ये वैभव सूर्यवंशीचीच चर्चा, जे काही लिहीलं ते वाचून म्हणाल...

त्यात बरोबर त्याच्या विरुद्ध बॉलिंग करणारे सर्वच दिग्गज होते हे ही विसरून चालणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

टीम इंडियाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी टी-20 संघात 15 वर्षाचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी याची निवड झाली आहे. त्याची निवड झाल्यानंतर त्याचीच चर्चा सगळीकडे आहे. इंग्लंड  आयर्लंडच्या बॉलर्सने ही त्याचा धसका घेतला आहे. त्याची चर्चा केवळ भारतातच नाही, तर इंग्लंडमध्येही मोठ्या प्रमाणावर होत आहे. इंग्लंडमधील आघाडीच्या न्यूज पेपरमध्ये सध्या वैभवबाबत भरभरून लिहीलं जात आहे. इंग्लंडचे आजी माजी खेळाडू वैभवच्या बॅटींगवर फिदा झाले आहेत. 

इंग्लंडचे खेळाडू म्हणतात की इतक्या लहान वयात त्याची परिपक्व आणि स्फोटक फलंदाजी पाहणे अत्यंत दुर्मिळ आहे. त्याची बॅटींग बघताना मजा येईल असं ही ते म्हणतात. मात्र इंग्लंडच्या फास्ट खेळपट्ट्यांवर वैभव कशी कामगिरी करतो, हे पाहण्यासाठी इंग्लिश क्रिकेटप्रेमी कमालीचे उत्सुक आहेत. ​स्काय स्पोर्ट्स क्रिकेटने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात  इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल एथर्टन वृत्तपत्रांमधील हेडलाईन्स दाखवताना दिसतोय. त्या बातमीमध्ये वैभवच्या आगामी इंग्लंड दौऱ्याचा उल्लेख आहे. 

Advertisement

नक्की वाचा- Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा लहान भाऊ आशीर्वादची चर्चा का? वडीलांनी थेट सांगितलं

 या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये एलिझाबेथ एमन आणि मार्क बुचर यांच्या हवाल्याने लिहिले आहे. ते लिहीतात इंग्लंड क्रिकेट बोर्ड खूप आनंदी असेल. त्याचे कारण ही तसेच आहे. वैभव खेळणार आहे त्यामुळे इंग्लंड इंडिया सामन्याची आणखी काही तिकिटे विकली जातील. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये 224 चा स्ट्राईक रेट असणे खरोखरच अप्रतिम आहे, असं ही यात म्हटलं आहे. त्यामुळे वैभवबाबत ब्रिटीशांना प्रचंड आकर्षण असल्याचं या बातमीवरून दिसून येत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वैभवचं कौतूक करत असताना लवकर इंग्लंडमध्ये ये तुढं स्वागत आहे असं ही म्हटलं आहे.

​नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या 19 व्या हंगामात वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटींगने सगळ्यांनाच चोप दिला. याच कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले. आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने सर्वाधिक 776 रन फटकावल्या आहेत. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व रन्स त्याने 237.30 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने केले आहेत. त्यात बरोबर त्याच्या विरुद्ध बॉलिंग करणारे सर्वच दिग्गज होते हे ही विसरून चालणार नाही.  भारताचा इंग्लंड दौरा 1 जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये 5 टी20 आणि 3 वनडे मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. पहिला टी20 सामना 1 जुलै रोजी चेस्टर ले स्ट्रीट येथे होईल. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद तर तिलक वर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या संघात वैभव सूर्यवंशीसह संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.