Vijay Hazare Trophy: कोण होते विजय हजारे? ज्यांच्या नावावर होतं क्रिकेटचं मोठं टूर्नामेंट, अनेकांना माहित नाही

ज्यांच्या नावावर ही मोठी टूर्नामेंट खेळवली जात आहे, ते विजय हजारे नेमके कोण होते?असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या त्यांच्याबाबत सविस्तर माहिती.

जाहिरात
Read Time: 2 mins
Vijay Hazare Cricket Career

Who Was Vijay Hazare : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. विजय हजारे हजारे ट्रॉफीच्या टूर्नामेंटमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळत आहे. विराटने नुकतीच 77 धावांची खेळी केली. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीची संपूर्ण क्रिकेटविश्वात तुफान रंगली आहे.याचसोबत युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे या टूर्नामेंटचा बोलबाला होत आहे. पण ज्यांच्या नावावर ही मोठी टूर्नामेंट खेळवली जात आहे, ते विजय हजारे नेमके कोण होते?असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या त्यांच्याबाबत सविस्तर माहिती.

विजय हजारे ट्रॉफीत खेळाडूंचा धमाका 

विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीसह रोहित शर्मा, ऋषभ पंत, रिंकू सिंग, देवदत्त पड्डीकल आणि साई सुदर्शनसारख्या खेळा़डूंनी अप्रतिम खेळी केली. याच स्टार खेळाडूंमुळे सोशल मीडियापासून गुगल ट्रेंडपर्यंत प्रत्येक ठिकाणी विजय हजारे ट्रॉफीबाबत चर्चा केली जात आहे.अनेक लोक या टूर्नामेंटचे सामनेही पाहत आहे.

नक्की वाचा >> ICC टी-20 वर्ल्डकपआधीच पाकिस्तानला 440 व्होल्टचा झटका! जिंकण्याच्या आशाच मावळल्या, एका व्हिडीओमुळे..

कोण होते विजय हजारे?

विजय हजारे भारतीय क्रिकेटर होते. ज्यंनी भारताला पहिली टेस्ट मॅच जिंकवून दिली होती. विजय सॅमुअल हजारे असं त्यांचं संपूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी झाला होता. ते फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ट्रीपल सेंच्युरी करणारे पहिले फलंदाजही होते. तसच त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंदही आहे. विजय हजारे यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 7 शतक ठोकले होते आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 60 शतके ठोकली होती. विशेष म्हणजे, त्यांनी 595 विकेट्सही घेण्याची उल्लेखनीय कामगिरीही केली होती.

नक्की वाचा >>Raigad News: "मंगेश काळोखेवर 13 वार करणारा आरोपी वाल्मिक कराडचा साथीदार..", खोपोली हत्याकांडाचं बीड कनेक्शन?

विजय हजारे यांना वर्ष 1960 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटर होते. त्यांचं जबरदस्त क्रिकेट करिअर पाहून वर्ष 2002 मध्ये त्यांच्या नावे म्हणजेच विजय हजारे ट्रॉफी सुरु करण्यात आली.विजय हजारे ट्रॉफीत भारताच्या अनेक राज्यांचे संघ एकमेकांविरोधात खेळतात. या राज्यांसाठी खेळणारे स्टार खेळाडूही त्यांच्या संघासाठी खेळतात. तसच अनेक युवा क्रिकेटर्सलाही दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. या टूर्नामेंटमध्ये जवळपास 38 संघ खेळतात. यामध्ये रेल्वे आणि सर्व्हिसेसच्या टीमही सामील होतात. 

Advertisement