- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह यांचा मैदानावरचा व्हिडीओ व्हायरल झालाय
- व्हिडीओमध्ये रोहितच्या चेहऱ्यावर नाराजी आणि रितिकाच्या बोलण्यात राग दिसून येत आहे
- सोशल मीडियावर या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया आल्या असून काहींना रोहितच्या रागाची चिंता वाटते
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Viral: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या दमदार कामगिरीमुळे चर्चेत आहे. पण सध्या सोशल मीडियावर त्याच्या एका वेगळ्याच व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय मिळवून जेतेपद पटकावल्यानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असतानाच, रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्यात भांडण झाले की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोघांचे हावभाव पहाता दोघांमध्ये काही तरी हमरी तुमरी झाल्याचं जाणवत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या काही वेळाचाच आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि रितिका मैदानाच्या बॉन्ड्री लाईनवर उभे आहे. तिथे ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये रोहितच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असून तो रितिकाच्या बोलण्यावर असहमती दर्शवताना जाणवतोय. रितिकादेखील काहीशा रागात बोलताना दिसत आहे. या दोघांमधील हा संवाद पाहून त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला असावा, असा तर्क लावला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक कमेंट ही आल्या आहेत.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. काहींनी रोहितच्या रागावर चिंता व्यक्त केली आहे. तर काहींच्या मते हे पती-पत्नीमधील साधे मतभेद असू शकतात. विशेष म्हणजे, व्हिडीओच्या शेवटी रितिका हसताना दिसत असल्याने हे भांडण गंभीर नसल्याचेही बोलले जात आहे. अद्याप या वादामागचे नेमके कारण समोर आलेले नाही, मात्र हा व्हिडीओ तुफान शेअर केला जात आहे. शिवाय हा वाद होता का की ते दोघे चर्चा करत होते याची ही चर्चा रंगली आहे.
विश्वचषकातील ऐतिहासिक विजयानंतर आता रोहित शर्मा आयपीएलच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. या आगामी हंगामात रोहित बॅटने कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मैदानाबाहेरील या व्हायरल व्हिडीओमुळे रोहित सध्या 'टॉक ऑफ द टाऊन' ठरला आहे. दरम्यान टीम इंडियाने टी 20 वर्ल्डकप पुन्हा एकदा आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी रोहित अहमदाबादला पोहोचला होता. त्यावेळचाच हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.