भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि जबरदस्त बॅट्समन स्मृती मंधानाच्या लग्नाची धूम सध्या सुरू आहे. संपूर्ण महिला क्रिकेट संघातील खेळाडू या लग्नात एकच धम्माल करत आहेत. स्मृतीच्या लग्नाच्या आदल्या रात्री मेहंदी आणि रंगीतचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्मृतीसह तिच्या संघातीलल जेमीमा रॉड्रीक्स, राधा ठाकूर, रेणूका, अरूंधती यांनी ही एकचत मज्जा केली. संगीत कार्यक्रमात स्मृतीनं तर सर्वांची वाह वा मिळवलीच पण या धाकड गर्ल्सनी आपल्या परफॉर्मन्सने सर्व उपस्थितांची मन ही जिंकली त्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
स्मृती मंधाना रविवारी लग्नाच्या गाठीत बांधली जाणार आहे. तिचं लग्न संगीतकार पलाश मुच्छाल याच्याशी होत आहे. तिच्या लग्नाची सांगलीमध्ये जोरदार तयारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विवीध विधी आणि कार्यक्रम इथं केले जात आहेत. तिच्या लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात स्मृती मंधाना आणि तिचा होणार नवरा पलाश मुच्छाल यांनी जबरदस्त डान्स करत उपस्थितांकडून वाह वा मिळवली. स्मृतीने तर सर्वांनाच आश्चर्य चकीत करत भन्नाट डान्स सादर केला. सोबतीला तिचा पती होताच. पण या डान्सची सुरूवात तिनी तिची पार्टनर जेमीना सोबत केली.
यानंतर जेमीमा रॉड्रीक्स, राधा ठाकूर, रेणूका, अरूंधती यांनी ही स्टेवर ठेका धरला. जाता हू मै तो मुझे जाने दे. तु परेशान क्यू है या गाण्यावर यांनी भन्नाट ठेका धरला होता. प्रत्येकीची स्टाईल आणि पोज शिट्ट्या आणि टाळ्या मिळवत होती. त्यांनी खास लग्नासाठी पेहराव ही केला होता. त्यामुले त्या सर्वांमध्ये उठून ही दिसत होत्या. बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी जणू त्यांनी खास तयारी केली होती. या आधी स्मृतीच्या हळदीचे फोटो ही व्हायरल झाले होते. त्यात ही यासर्व जणी धम्माल करताना दिसल्या होत्या. जेमीमा आणि स्मृती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर हे व्हिडीओ पोस्ट केले आहे. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. सध्या हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.