हार्दिक पंड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार? 'त्या' गूढ पोस्टमुळे उलट-सुलट चर्चांना उधाण, धोनी कनेक्शन काय?

चालू हंगामात मुंबई इंडियन्सच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या १९ व्या हंगामातील प्रवास अत्यंत निराशाजनक पद्धतीने समाप्त झाला आहे
  • हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असून तो चेन्नई सुपर किंग्समध्ये जाण्याची चर्चा आहे
  • हार्दिकने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमधील वेळ आणि वस्तूंमुळे चाहत्यांनी धोनीशी संबंध जोडला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

मुंबई इंडियन्सचा (MI) आयपीएलच्या 19 व्या हंगामातील प्रवास अत्यंत निराशाजनक पद्धतीने संपला. या खराब कामगिरीनंतर आता संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. तो चेन्नई सुपर किंग्स (CSK) मध्ये सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. हार्दिकच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या असून, यामध्ये 'एमएस धोनी' अँगल समोर आला आहे.

नक्की वाचा - Vinod Kambli: आधारा शिवाय चालणं ही कठीण! मॅच पाहण्यासाठी आलेल्या विनोद कांबळीचा Video Viral, चाहते हेलावले

32 वर्षीय हार्दिक पंड्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो लॅपटॉपवर चित्रपट पाहत असल्याचे दिसत आहे. मात्र, चाहत्यांचे लक्ष लॅपटॉप शेजारी असलेल्या वही, पेन आणि मोबाईलवरील वेळेकडे गेले. मोबाईलवर बरोबर '07:07' ही वेळ दिसत होती. महेंद्रसिंग धोनीचा जर्सी नंबर 7 असल्याने, चाहत्यांनी या वेळेचा संबंध थेट धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सशी जोडला आहे. हार्दिक आगामी काळात 'यलो जर्सी'मध्ये दिसणार असल्याचा अंदाज क्रिकेटप्रेमी वर्तवत आहेत. मात्र, मुंबई इंडियन्स किंवा हार्दिक पंड्याकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Advertisement

नक्की वाचा - LSG vs PBKS: बाप तो बापचं! पहिल्याच सामन्यात लेकानं मैदान गाजवलं, सचिनची पोस्ट चर्चेत, पण...

चालू हंगामात मुंबई इंडियन्सच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले होते. हार्दिकच्या वर्तनावर अनेक खेळाडू नाराज होते. याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. मुंबईचा संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानावर राहिला. हार्दिकच्या भविष्याबाबत बोलताना मुंबईचा सहाय्यक प्रशिक्षक कीरोन पोलार्ड म्हणाला, "या विषयावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. सध्या घेतलेले निर्णय हे भावनिक असू शकतात. त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करूनच काय ते ठरवले जाईल." असं ते म्हणाले.