IND vs SA: जैस्वालनं वनडेत ठोकलं पहिलं शतक! हा स्पेशल रेकॉर्ड केला, रोहित शर्मा, KL राहुल, विराट अन् गिलही..

पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालवर चाहत्यांनी टीका सुरू केली होती. पण आज दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात जैस्वालने स्पेशल रेकॉर्ड केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
yashasvi jaiswal sets special record
मुंबई:

India vs South Africa, 3rd ODI, Yashasvi Jaiswal:  पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालवर चाहत्यांनी टीका सुरू केली होती.खरंतर,डावखुऱ्या फलंदाजाला गेल्या काही महिन्यांपासून संघात संधी न दिल्यामुळे चाहते नाराज होते.जैस्वालचा हक्क हिरावून घेतला जात आहे, असं क्रिकेटचे तज्ज्ञ मंडळीही म्हणत होते. पण रांची आणि रायपूरमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये जैस्वालला धावांचा सुर गवसला नाही,तेव्हा त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती.जैस्वालला संधीचा फायदा घेता येत नाहीय, असं त्यांनी म्हटलं होतं.पण आज दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात जैस्वालने धावांचा पाऊस पाडला.

त्याने 121 चेंडूत 116 धावांची नाबाद शतकी खेळी केली आणि भारताला दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने 2-1 ने ही मालिका खिशात घातली. यामध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. जैस्वालची शतकी खेळी आणि रोहित शर्माने केलेल्या 75 धावांच्या अर्धशतकामुळे भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. भारताने 39.5 षटकात 1 विकेट गमावत 271 धावा करून विजयाला गवसणी घातली.

नक्की वाचा >> गुड न्यूज! LIC च्या 2 नव्या स्कीम लॉन्च, विम्यासोबतच सेव्हिंग अन् 2 कोटींपर्यंत होणार फायदा

अशी कामगिरी करणारा ठरला सहावा फलंदाज

जैस्वालने भारतीय इनिंगच्या 36 व्या षटकात कॉबिन जोशच्या पहिल्याच चेंडूवर फाइन लेगला फटका मारला आणि शतकापर्यंत मजल मारली. त्यानंतर त्याने दोन्ही हात हवेत उंचावून मैदानात मोठं सेलीब्रेशन केलं. पहिल्या शतकाचा आनंद लुटणे हे स्वाभाविकच आहे. पण जैस्वालला कदाचित हे ठाऊक नव्हते की त्याने भारतीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

नक्की वाचा >> Viral Video: डोक्यावर पदर, हातात हिरवा चुडा अन् गालावर लाली, कोण आहे 'गिटारवाली बाई'? सूनेनं सासर गाजवलं!

जैस्वाल क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.जैस्वालनंतर अशी कामगिरी करणाऱ्यांमध्ये  सुरेश रैना,रोहित शर्मा,केएल राहुल,विराट कोहली आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. जैस्वालने जबरदस्त कामगिरी करून निवडकर्त्यांच्या भुवयाच उंचावल्या आहेत. 

Advertisement