Video : फॉरेनर महिलेसमोर देशाचं नाक कापलं..सेल्फीसाठी केलं नको ते कृत्य, मुंबईचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल

परदेशी महिलेला पाहताच मुंबईतील भामट्याने असं कृत्य केलं, ज्यामुळे देशाच्या संस्कृतीला डाग लागला आहे. व्हायरल व्हिडीओमुळं खळबळ उडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Foreigner Woman Visits Mumbai Video Viral
मुंबई:

Foreigner Tourist In India: परदेशी महिलेला पाहताच मुंबईतील भामट्यांनी असं कृत्य केलं, ज्यामुळे देशाच्या संस्कृतीला डाग लागला आहे. सेल्फीसाठी एका परदेशी महिलेचा 15 मिनिटे पाठलाग करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सेल्फीसाठी नकार दिल्यानंतरही या तरुणांनी तिचा पाठलाग केला.त्यानंतर संतापलेल्या या परदेशी महिलेनं तरुणांचा व्हिडीओ काढून इंटरनेटवर शेअर केला आहे. 

भारतात मुंबई महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक असल्याचं मानलं जातं. पण काही विकृत माणसं महिलांची छेडछाड करतात, अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत.नुकतच एका परदेशी महिलेच्या व्हायरल व्हिडीओमुळं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण दोन तरुणांनी या महिलेकडे सेल्फी काढण्यासाठी जबरदस्ती केली. तिने नाही म्हटल्यावर त्यांनी तिचा पाठलाग केला आणि सेल्फीची जबरदस्तीने मागणी केली.

इथे परदेशी महिलेचा पाठलाग करणाऱ्याचा व्हायरल व्हिडीओ

 परदेशी नागरिक भारतात आल्यानंतर देशाची संस्कृती जपणे सर्वांचच कर्तव्य असतं. परंतु, काही लोक परदेशी पाहुण्यांचा अनादर करतात आणि देशाच्या संस्कृतीला डाग लावतात. भारतीयांचा जगभरात सन्मान केला जातो,कारण ते महिलांचा आदर करतात.पण परदेशी महिलेला त्रास देणाऱ्या अशा तरुणांमुळे देशाच मान सन्मानाला ठेच पोहोचते. 

ही परदेशी महिला एक सोले ट्रॅव्हलर आहे. म्हणजेच एकट्याने देशाची भटकंती करणे. या महिलेनं इन्स्टाग्रामवर जो व्हिडीओ पोस्ट केला आहे.त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ती काही महिन्यांपासून भारतात आहे आणि तिला अशाप्रकारच्या परिस्थितीला पहिल्यांदाच सामोरं जावं लागलं आहे. व्हिडीओत पाहू शकता की, तरुण या महिलेकडं सतत सेल्फीची मागणी करतो आणि पंधरा मिनिटे तिचा पाठलाग करतो.

Advertisement