विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur Crime : प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना हातकणंगले तालुक्यात घडली. कबनूर येथील लक्ष्मी माळ परिसरात पाच जणांच्या टोळक्याने मिळून तरुणावर हल्ला केल्यानंतर खळबळ उडाली. वैभव अनिल पुजारी असं जखमी तरुणचं नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव याने महिन्याभरापूर्वी प्रेमविवाह केला. त्या रागातून चौघांनी मोटारसायकलवरून वैभव याचा पाठलाग केला. आभार फाट्यावरील लक्ष्मी माळ येथे टोळक्यातील एकाने 'वैभ्या तुझी आता काही खैर नाही. तुला आज आम्ही जिवंत सोडणार नाही', अशी धमकी दिली. तर चौघांनी वैभव याला ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारी घेऊन पाठलाग सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने ज्या तरुणीसोबत लग्न केलं होतं, तिच्या कुटुंबीयांनाही हे लग्न आवडलं नव्हतं. त्यातून हा हल्ला झाला की नाही ते अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.
नक्की वाचा - Mumbai Crime: मद्यपी तरुणाचा हैदोस! पोलीस स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, मुंबईतील संपाजनक प्रकार
वैभव हा जीव वाचविण्यासाठी एका घरात शिरला. ओंकार, शुभम आणि राहुल यांनी तलवारीने वैभव याच्या हातावर, पाठीत, डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. ही माहिती समजताच पोलिसांनी व मित्रांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.