हैवान डॉक्टर! तब्बल 2 दशकांचा काळ, 87 महिलांवर अत्याचार, 6000 तासांचे अश्लील व्हिडीओ

शिवाय 70 पीडित महिलांनी आरोपीविरोधात जवाब नोंदवल आहे. ही घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

तब्बल दोन दशकांचा काळ. 87 महिलांवर बलात्कार आणि 6000 तासांचे अश्लील व्हिडीओ.  हा धक्कादायक प्रकार घडलाय नॉर्वेमधल्या फ्रॉस्टा नावाच्या छोट्याशा गावात. डॉक्टरला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. पण नॉर्वेमधील एका डॉक्टरने क्रूरतेचा कळस गाठला आहे. या डॉक्टरचं नाव आहे अर्ने बाय. तो जवळपास  55 वर्षाचा आहे.  त्याचं राहाणीमान राहिलं तर अगदी साधं राहणीमान दिसायचं. चेहऱ्यावर गोड हास्य. पण याच गोड हसण्यामागे एका सैतानाचा चेहरा लपला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अर्ने बाय नॉर्वेच्या फ्रॉस्टा गावात स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत होता. 2004 ते 2022 या काळात त्याने 80 हून अधिक महिला रुग्णांवर अत्याचार केला आहे.यावेळी तो महिलांचे व्हिडीओदेखील चित्रित करायचा. पोलीस तपासात तब्बल सहा हजारहून अधिक व्हिडीओ हाती लागलेत आहे. शिवाय 70 पीडित महिलांनी आरोपीविरोधात जवाब नोंदवल आहे. ही घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. एक डॉक्टर असं काही करू शकतो यावर कुणाचाही विश्वास बसायला तयार नाही.  

ट्रेंडिंग बातमी - Akola News: 'माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर...', 2 मुलांची आई, 2 वर्ष लैंगिक शोषण, हादरवून टाकणारी घटना

या खटल्यात आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांमधली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे. या गुन्ह्यांदरम्यान डॉक्टर बायने सर्व महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले होते. महिलांनी खोट्या तक्रारी दाखल करून नयेत म्हणून व्हिडीओ बनवल्याचं त्याने कोर्टात सांगितंल. हे घृणास्पद प्रकरण नॉर्वेतलं आतापर्यंतचं सर्वात मोठं लैंगिक छळाचं प्रकरण म्हणून समोर आलं आहे. न्यायालयाने या प्रकरणात डॉक्टरला दोषी ठरवलं आहे. शिवाय त्याला आता 21 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Raj News: 'हो आम्ही घाबरलोय'! ठाकरे एकत्र येणार यावर राणे थेट बोलले

नॉर्वेतल्या डॉक्टरची कृत्य बघता महिलांनी अधिक सावध होणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे डॉक्टरकडे जाताना महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण तज्ञांकडून जाणून घेतलं पाहीजे. नॉर्वेतल्या हैवान डॉक्टरच्या कृत्यामुळे संपूर्ण डॉक्टरी पेशाला काळीमा फासला गेला आहे. महिला मोठ्या विश्वासाने उपचारासाठी डॉक्टरांकडे जातात. पण त्या डॉक्टरच्या रुपात एक हैवान लपला असेल तर, म्हणूनच सावध व्हा, सजग राहाण्याची गरज आहे.