तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यात एडप्पाडीतील एक धक्कादायक घटना घडली आहे. स्कूल बसने जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं. भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले, ज्यात एका विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. मृत्यूमुखी पडलेला विद्यार्थी आणि त्याचे ज्या विद्यार्थ्यासोबत भांडण झाले तो विद्यार्थी हे दोघे 9 वीत शिकणारे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही बस वेल्लंदिवलासू नावाच्या भागात पोहोचली तेव्हा या दोघांमध्ये भांडणाला सुरूवात झाली होती. अमित (बदललेले नाव) आणि कंदगुरूमध्ये भांडणाला सुरुवात झाल्यानंतर अमितने कर्कटक काढले आणि त्याने कंदगुरूच्या छातीवर वार केले. जखमी झालेला कंदगुरू बसमध्ये कोसळला आणि बेशुद्ध पडला.
नक्की वाचा :13 हजार पगार, छत्रपती संभाजीनगरच्या घोटाळेबाजाकडे जगातला सगळ्यात महागडा गॉगल; किंमत ऐकून चक्कर येईल
उपचारादरम्यान कंदगुरूचा मृत्यू
कंदगुरू बेशुद्ध झाल्याचं कळाल्यानंतर बसचालक आणि वाहकाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सालेम जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती पाहून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांना त्याचे प्राण वाचवण्यात यश आलं नाही.
नक्की वाचा : अविवाहित सख्ख्या बहीण भावाचे राहत्या घरात टोकाचं पाऊल, भयंकर कारण आलं समोर
आई-वडिलांनी दाखल केली तक्रार
कंदगुरूच्या आई-वडिलांनी पोलिसांत तत्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अमितला ताब्यात घेतले. अमितची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. बसमध्ये कुठे बसायचं यावरून झालेल्या वादातून हा सगळा भयंकर प्रकार झाला आहे. यात एका मुलाचा मृत्यू झाला असल्याने सदर प्रकरण हे अत्यंत गंभीर बनले आहे. या घटनेमुळे लहान मुलं हल्ली किती हिंसक बनत चालली आहे, याचं पुन्हा एकदा उदाहरण पाहायला मिळालं आहे.