Crime News : कर्नाटकच्या सिरसीमधून एक हैराण (Karnatak News) करणारी घटना समोर आली आहे. येथे एक सात वर्षांच्या मुलाने चुकून आपल्या नऊ वर्षांच्या भावाची हत्या केली. करियप्पा असं मृत बालकाचं नाव आहे. करियप्पा हा (9) सोमनल्ली गावातील एका घरात काम करणाऱ्या बसप्पा उंडियारचा मुलगा होता. घटनेच्या वेळी तो आपल्या सात वर्षांच्या भावासोबत खेळत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांच्या मुलाच्या हातात एक एअर गन होती. माकडांना पळवण्यासाठी माळ्याने ती आपल्याकडे ठेवली होती. खेळत असताना लहान भावाने चुकून ट्रिगर दाबलं आणि गोळी करियप्पाच्या छातीत लागली. यानंतर त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
नक्की वाचा - Crime News : 760 ग्रॅम सोनं, 150 ग्रॅम हिरे, माणिक अन् पन्ना; दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 1 कोटी कलशाची चोरी
या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. पोलीसही त्याचा तपास करीत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जगदीश, पोलीस उपाधीक्षक गीता पाटील आणि सीपीआय शशिकांत वर्माने घटनास्थळावर तपासणी केली. मृतदेहाच्या पोस्टमार्टमसाठी सिरसी रुग्णालयात पाठविण्यात आलं. सिरसी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.