सोशल मीडिया कसा घात करतो याची अनेक उदाहरणे आपण पाहीली आहेत. असे असतानाही सावध होण्या ऐवजी त्या जाळ्यात अनेक जण आजही फसत आहेत. अशीच एक घटना खारघर पोलिस स्थानकाच्या हद्दीद घडली आहे. फेसबुकवर झालेली एक ओळख एकाला महागात पडली आहे. फेसबूकवर ओळख झालेल्या व्यक्तीने आपल्याकडे सोन्याची बिस्कीट आहे असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून एकाने ती खरेदी करण्याची तयारी दर्शवली. पण त्यानंतर त्याच्या बरोबर जे झालं ते भयंकर होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फेसबुकवर पिडीत व्यक्ती एका बरोबर ओळख झाली. त्याने त्याल आपल्याकडे सोन्याची दोन बिस्कीट असल्याचे सांगितले.शिवाय त्याची किंमत जवळपास पंधरा लाख असल्याचे सांगितले. मात्र पैशाची गरज असल्याने ती तेरा लाखात देण्यास तो तयार झाला. पिडीत व्यक्तीलाही त्याचा विश्वास झाला. त्याने तेरा लाखात बिस्कीट घेण्याचे मान्य केले. पिडीत व्यक्तीला पैसे घेवून संबधित फेसबुक वरील व्यक्तीने सांगितले. त्यानुसार पिडीत तेरा लाख रूपये घेवून गेला.
ट्रेंडिंग बातमी - नंबर गेम! शरद पवारांचे मोठं भाकीत, महायुतीचे टेन्शन वाढले?
पैसे घेवून आलेले पाहीन सहा ते सात जणांनी त्याला घेरले. आपण पोलिस असल्याचे त्याला सांगितले. चौकशीसाठी त्यांनी त्या पिडीत व्यक्तीला गाडीत बसवले. त्याच्याकडील सर्व पैसे काढून घेतले. त्यानंतर त्याला गाडी बाहेर फेकून ते सर्व जण पसार झाले. आपली फसवणूक झाली आहे, हे त्याला लक्षात आले. त्याने तातडीने खारघर पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनीही तातडीने सुत्र हलवली.
ट्रेंडिंग बातमी - पुण्यातला तरुण 6 दिवसांपासून अमेरिकेत बेपत्ता, आई-वडिलांनी केली PM मोदींना विनंती
पोलिसांनी केलेल्या तपासात हे गुन्हेगार सराईत असल्याचे लक्षात आले. त्यांच्यावर याच पद्धतीचे गुन्हे या आधीही दाखल होते. ते सर्व जण जामीनावर सुटले होते. या गुन्ह्यातील सात जणांना पोलिसांनी भिवंडी, कल्याण आणि डोंबिवलीतून अटक केली आहे. हे सर्व जण कमी शिकलेले आहेत. शिवाय या आधीही त्यांनी अशाच पद्धतीच्या चोऱ्या केल्या आहेत. हे चौकशीमध्ये पुढे आले आहे. तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिस या आरोपीपर्यंत पोहचले. त्यांच्याकडून रोख रक्कम, त्याच बरोबर गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. गुन्ह्यात आरोपींकडून एकूण १२ लाख २७ हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.