बँक खाते रिकामे करणारा नवा गेम! डीपफेक आणि AI च्या जाळ्यात भारतीय ग्राहक कसे फसतात? पाहा धक्कादायक अहवाल

Banking AI Fraud 2026 : सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आता केवळ जुन्या पद्धती वापरून लोकांची फसवणूक करत नाहीत, तर ...

जाहिरात
Read Time: 3 mins
Banking AI Fraud 2026: सायबर गुन्हेगारांच्या पद्धती पूर्वीपेक्षा अत्याधुनिक आणि गुंतागुंतीच्या झाल्या आहेत.(प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Banking AI Fraud 2026: तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा गुगल पे, फोन पे सारख्या यूपीआय ॲप्सवरून पैशांचे व्यवहार करता का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक आहे. सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आता केवळ जुन्या पद्धती वापरून लोकांची फसवणूक करत नाहीत, तर ते यासाठी थेट कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आले आहे की, एआयमुळे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत संपूर्ण जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील बँकिंग क्षेत्रासमोर आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि गंभीर आव्हान मानले जात आहे.

जागतिक सर्वेक्षणातून धक्कादायक सत्य उघड

बायोकॅच या प्रसिद्ध संस्थेने जगातील 5 खंडांमधील 25 देशांमध्ये एक व्यापक सर्वेक्षण केले. यामध्ये बँकांचे फसवणूक-व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा विभागाच्या 1440 प्रमुखांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या सर्वेक्षणात भारतातील 100 सर्वोच्च बँक अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 

Advertisement

सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील बँका एआय फसवणुकीमुळे सर्वाधिक चिंतेत आहेत. सुमारे 90 टक्के भारतीय बँक प्रमुखांनी मान्य केले आहे की, त्यांच्या संस्थेमध्ये एआयच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रयत्न खूप वेगाने वाढत आहेत, तर गेल्या वर्षी हे प्रमाण 70 टक्के होते.

( नक्की वाचा : Fact Check: तुमच्या खिशातील 100, 200, 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? 30 जूनच्या तारखेचं RBI नं सांगितलं सत्य )

सायबर गुन्हेगार झाले हुशार

बँक प्रमुखांच्या मते, एआय तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या पद्धती आता पूर्वीपेक्षा खूप अधिक अत्याधुनिक आणि गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. सुमारे 90 टक्के तज्ज्ञांना अशी भीती आहे की, जेव्हा येत्या काळात एआय सिस्टीम स्वतःहून व्यवहार करू लागेल, तेव्हा सामान्य ग्राहकाचा प्रामाणिक व्यवहार कोणता आणि गुन्हेगाराचा फसवणुकीचा व्यवहार कोणता, यातील फरक ओळखणे बँकांच्या पारंपरिक सुरक्षा यंत्रणांना अशक्य होईल. तसेच गेल्या वर्षभरात हुबेहूब आवाज किंवा खोटे व्हिडिओ बनवून तोतयागिरी करण्यासाठी 'डीपफेक्स' तंत्रज्ञानाचा वापर तब्बल 64 टक्के वाढला आहे.

बँकांना आणि ग्राहकांना अब्जावधी रुपयांचा फटका

या वाढत्या सायबर हल्ल्यांमुळे केवळ बँकांचेच नव्हे, तर सर्वसामान्य ग्राहकांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. भारतातील सुमारे 48 टक्के बँकांना दरवर्षी 10 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागते, तर 6 टक्के बँकांचे वार्षिक नुकसान 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 

दुसरीकडे, ग्राहकांची फसवणूक करून त्यांचे पैसे उडवण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. सुमारे 58 टक्के बँक प्रमुखांनुसार, अधिकृत वाटणाऱ्या बनावट योजना किंवा लिंक्सच्या जाळ्यात अडकून ग्राहकांना दरवर्षी 5 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक फटका बसत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
 

इन्स्टंट पेमेंट आणि यूपीआय  सॉफ्ट टार्गेट

भारतात ग्राहकांकडून यूपीआयचा म्हणजेच डिजिटल पेमेंटचा अत्यंत वेगाने स्वीकार केला गेला आहे. मात्र, हाच वेग आता फसवणूक करणाऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. भारतातील 66 टक्के बँक प्रमुखांच्या मते, इन्स्टंट पेमेंट ॲप्सवरील फसवणुकीचे प्रयत्न हे देशातील सायबर गुन्हे वाढण्याचे मुख्य कारण आहे. 

या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतातील 94 टक्के तज्ज्ञांचे असे मत आहे की, जर देशातील सर्व बँकांनी अंतर्गत माहितीची देवाणघेवाण केली आणि पैसे जमा होणाऱ्या खात्याची रिअल-टाइम म्हणजेच तात्काळ माहिती उपलब्ध झाली, तर ही फसवणूक रोखणे अधिक सोपे होईल.

Advertisement

डिजिटल व्यवहार अधिक स्वयंचलित होत असल्याने आता जुन्या ओळख पडताळणी पद्धती अपुऱ्या पडत आहेत, असे बायोकॅचचे सीईओ गदी माझोर यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून बायोकॅच ही कंपनी मानवी वर्तनातील पद्धती ओळखून गुन्हे रोखण्याचे काम करत आहे. ग्राहक जेव्हा डिजिटल बँकिंग वापरतात, तेव्हा ही यंत्रणा कीबोर्डवरील बटणे दाबणे, माउस फिरवणे किंवा स्क्रीन टच करण्याची पद्धत अशा 3000 पेक्षा जास्त निनावी गोष्टींचे सतत विश्लेषण करते. याद्वारे डिजिटल बँकिंगच्या प्रत्येक मिलिसेकंदाला युझरचा खरा हेतू काय आहे आणि त्याच्यावर कोणताही दबाव आहे का, हे ओळखले जाते. 

सध्या जगातील 100 सर्वात मोठ्या बँकांपैकी 30 पेक्षा जास्त बँका या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 68 कोटींपेक्षा जास्त खात्यांचे रक्षण करत आहेत.

Topics mentioned in this article