Akola News: अकोला हादरले! गजानन हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे टोकाचे पाऊल; दरवाज्यातून समोर आले भयावह सत्य

Akola News: अकोला शहरातील प्रसिद्ध गजानन हॉस्पिटलमध्ये आज सकाळी ( गुरुवार 23 ऑक्टोबर) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News:   वॉर्डमधील नर्स रुग्णाला तपासण्यासाठी गेल्या असता, दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अकोला:

योगेश शिरसाट प्रतिनिधी अकोला 

Akola News:  अकोला शहरातील प्रसिद्ध गजानन हॉस्पिटलमध्ये आज सकाळी ( गुरुवार 23 ऑक्टोबर) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या अमरावती जिल्ह्यातील एका 32 वर्षीय रुग्णाने हॉस्पिटलच्या वॉर्डमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली.

काय आहे प्रकरण?

मृत रुग्णाचे नाव अमोल हरिचंद्र कावनपुरे (वय 32, रा. पहाडीपुरा, बनोसा, ता. दर्यापूर, जि. अमरावती) असे आहे. अमोल कावनपुरे हे त्यांच्या पायाच्या उपचारासाठी 18 ऑक्टोबर रोजी गजानन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.

गुरुवारी, सकाळी सुमारे 9 वाजता, वॉर्डमधील नर्स रुग्णाला तपासण्यासाठी गेल्या असता, दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच वेळ दरवाजा उघडला जात नसल्याने, रुग्णाचे नातेवाईक आणि हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी दरवाजा तोडला.

( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, गॅरेज फोडून लाखोंची चोरी, पाहा CCTV Video )

गळफास घेऊन आत्महत्या

दरवाजा तोडल्यानंतर उपस्थित लोकांना अमोल कावनपुरे यांनी दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दृश्य दिसले. तातडीने डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Advertisement

आजाराला कंटाळून टोकाचे पाऊल

घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवला आहे.

( नक्की वाचा : Akola : माजी आमदाराच्या वाढदिवसाहून परतणाऱ्या कारला भीषण अपघात; 1 ठार, शहरप्रमुखासह 5 गंभीर जखमी )

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमोल कावनपुरे यांनी त्यांच्या पायाला झालेल्या आजाराला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल (Autopsy Report) आणि पोलिसांच्या सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल. सध्या सिव्हिल लाईन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे रुग्णालय परिसरात आणि स्थानिक भागात खळबळ उडाली आहे. दीर्घकालीन किंवा गंभीर आजारांमुळे नैराश्यात (Depression) जाणाऱ्या रुग्णांच्या मानसिक आरोग्याच्या (Mental Health) प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
 

Advertisement

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Topics mentioned in this article