मराठवाड्यात अवैध पद्धतीने गर्भपात करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. आजही खुलेआम पद्धतीने अवैध गर्भपात केले जात आहेत. याचीच माहिती वैद्यकीय अधिकारी आणि नांदेड पोलीसांना मिळाली. तातडीने पोलीसांनी यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पथकही तयार झाले. त्यांनी धाड टाकण्याचा निर्णय घेतला. गर्भपात करणारा डॉक्टरही बोगस होता. यातीही माहिती पोलीसांना मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी धाडही ठाकली. पण ज्यावेळी धाड टाकली त्यावेळ पोलीसांनी जे काही पाहीले त्यावरू ते आवाक झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बोगस डॉक्टर दोन महिलांचा अवैध गर्भपात करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. नांदेडच्या सरसम भागात पंडित वाठोरे हा बोगस डॉक्टर आहे. नई आबादी भागातील एका घरात गर्भपात करत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. वैद्यकीय अधिकारी आपल्या पथकासह तिथे पोहोचले. पण पथक आल्याची कुणकुण लागल्याने बोगस डॉक्टर आणि गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिला अंधाराचा फायदा घेऊन पळाले.
पोलीस आणि वैद्यकीय पथकाने छापा टाकल्यानंतर ते तिथून फरार झाले. फरार झालेल्यामध्ये दोन महिला आणि बोगस डॉक्टरचाही समावेश आहे. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस स्थानकांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी छापा टाकला त्या ठिकाणी पथकाला पेन किलर, गर्भपात करण्याचे किट आणि इतर साहित्य आढळले आहे. आरोग्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून बोगस डॉक्टर विरुद्ध हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या घटनेनंतर मराठवाड्यात होत असलेल्या अवैध गर्भपाताचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.