हगवणे कुटुंबीयांच्या जवळचे IPS अधिकारी सुपेकरांवर अंजली दमानियांचा गंभीर आरोप, Audio Clip च ऐकवली

वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विशाल पाटील, प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. सुपेकर हे हगवणे कुटुंबीयांच्या जवळचे आहेत. त्यांनी या प्रकरणात त्यांना मदत केली असा आरोप, यापूर्वी झाला आहे. दमानिया यांनी शनिवारी, मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आणखी एक आरोप केला. याबाबतची एक कथित ऑडिओ क्लिपच त्यांनी ऐकवली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय केला आरोप?

राज्यातील कारागृहात सन 2023 ते 2025- 2026 या वर्षांमध्ये रेशन, कॅंन्टीन व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये जवळपास 500 कोटी रुपयाहून अधिक रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून आपलं नाव वगळावं आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांचं नाव टाकावं  यासाठी सुपेकर यांनी दबाव टाकल्याचा आरोप दमानिया यांनी केला. 

याबाबतची एक कथित ऑडिओ क्लिपच  दमानिया यांनी ऐकवली. ही ऑडिओ क्लिप अद्याप व्हेरिफाय नाही. पण, ती व्हेरिफाय करण्याचं पोलिसांच्या हातामध्ये आहे. ही ऑडिओ क्लिप मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे, असं दमानिया यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : गौतमी पाटीलला बैलासमोर नाचवलं! वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक प्रताप उघड, पाहा Video )

जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतेक मोठे कारागृह यांच्या हातात आहेत. हगवणे कुटुंबीय जेलमध्ये गेलं तर त्यांना सुपेकरांच्या कृपेनं चांगली ट्रिटमेंट मिळेल, त्यामुळे हा खटला सुरु आहे तोपर्यंत त्यांना कार्यापासून दूर ठेवावं अशी मागणी दमानिया यांनी केली.

Advertisement

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला बंदुकीचं लायसन्स हे सुपेकर यांच्यामुळेच मिळालं. त्याला ग्रामीण पातळीवर परवानगी नाकारण्यात आली होती, पण ती सुपकेर यांनी मिळवून दिली, असा आरोपही दमानिया यांनी केला.