Jalna News: अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांना अटक, छत्रपती संभाजीनगरात लावला होता ट्रॅप, 'ते' एक प्रकरण भोवलं

अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा पथकांनी छत्रपती संभाजीनगर शहरात 6 लाख 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आणि अटक केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
ACB Arrested Ambad Tehsildar Vijay Chavan

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Ambad Tehsildar Bribe Case :  अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा पथकांनी छत्रपती संभाजीनगर शहरात 6 लाख 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आणि अटक केली. अंबड तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी पोकलणवर कारवाई न करण्यासाठी आणि सहा हायवा ट्रक अवैध वाहतूकीसाठी सुरू ठेवण्यासाठी दरमहा सात लाख रुपयांची लाचेची मागणी चव्हाण यांनी केली होती.तक्रारदाराने ही लाच देण्यास नकार दिला आणि एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर बीडच्या पथकांनी याप्रकरणाचा तपास केला आणि चव्हाण यांना लाच घेताना पकडलं.

3 स्वतंत्र फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले

याबाबत सविस्तर वृत्त असं की,दोन दिवसांपासून तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून व इतर ठिकाणांहून अवैध वाळू उत्खनन होते होते. यावर कारवाई करण्यासाठी चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाची मदत घेतली.अंबड तालुक्यातील बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या आणि शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या वाळू माफियां विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते.तसे आदेश चव्हाण यांनी दिले होते. चव्हाण यांच्या आदेशानुसार गोंदी पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. 

Advertisement

नक्की वाचा >>Pune News: संत तुकाराम-ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखीचे वेळापत्रक जाहीर, पुण्यात कुठे-कुठे असणार मुक्काम?

'झिरो टॉलरन्स' धोरण सुरु केलं अन्..

चव्हाण यांनी वाळू माफिया अवैध वाळू वाहतूक आणि शासकीय कामातील हस्तक्षेपाबाबत 'झिरो टॉलरन्स' (Zero Tolerance) धोरण सुरू केलं.
तालुक्यातील इतर ठिकाणची गोपनीय माहिती गोळा करून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल. तसच अवैध उत्खनन व वाहतुकीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व वाळू माफिया आणि तस्करांना कारवाईचा इशारा चव्हाण यांनी दिला होता.त्यांच्याविरुद्ध केवळ दंडात्मकच नव्हे,तर 'मोक्का'(MCOCA) आणि 'एमपीडीए'(MPDA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल,असंही त्यांनी म्हटलं होतं.परंतु, चव्हाण स्वत:लाच घेताना रंगेहाथ पकडले गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा >> Nashik News : बोगस तृतीयपंथीय पंचवटीच्या फुल बाजारात घुसला, महिलांकडे केली 'ती' मागणी, लोकांनी धू-धू धुतला