महिलांवर अत्याचार होतात याचा बातम्या आपण नेहमी ऐकत असतो. सासरच्या जाचाला कंटाळून अनेक महिला आपलं जिवन संपवतात. पण गेल्या काही वर्षांत पुरुषांवरिल अत्याचारातही वाढ झालेली दिलते. त्यातून त्यांनी टोकाची पाऊल उचलल्याचंही समोर आलं आहे. बंगळुरूच्या अतुल सुभाषचं प्रकरण ताजं आहे. तसचं एक सर्वांना हादरवून सोडणारं प्रकरण उत्तर प्रदेशातल्या इटावा इथं घडलं आहे. इथं एका इंजिनिअर तरूणानं आत्महत्या केली आहे. त्या मागचे कारण ज्यावेळी समोर आले त्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोहित यादव हा पेशाने इंजिनिअर होता. त्याचं वय 33 वर्ष होतं. त्याने इटावा रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करण्या आधी त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. त्यात आपण आत्महत्या का करत आहोत याचा धक्कादायक खुलासा केला आहे. मोहितने 27 नोव्हेंबर 2023 साली लग्न केलं होतं. पत्नी प्रिया बरोबर तो जवळपास सात वर्ष रिलेशनमध्ये होता.त्यानंतर घरच्यांच्या परवानगीने त्यांनी विवाह केला होता. सुरूवातीला सर्व काही ठिक चाललं होतं. पण नंतर सारं काही बिघडलं.
दोन महिन्या पूर्वी प्रिया यादव म्हणजेच मोहितच्या पत्नीला बिहारच्या समस्तीपूर इथं सरकारी नोकरी लागली. ती शाळेवर शिक्षिका म्हणून रुजू झाली. तिथेच सर्व चक्र फिरली. मोहितने जो व्हिडीओ केला आहे त्यात त्याने याचा उल्लेख केला आहे. त्याची पत्नी गर्भवती होती. पण तिने तिच्या आईच्या सांगण्यावरून गर्भपात केला असा आरोप या व्हिडीओत मोहितने केला. शिवाय नोकरी लागल्यानंतर प्रियाचं रंग बदलले होते. तिने मोहितची संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी तगदा लावला होता. तसं केलं नाही तर खोट्या हुंड्याच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी ही ती देत होती असा त्याने आरोप केला आहे.
त्याच व्हिडीओत तो म्हणतो की जर पुरूषांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काही कायदे असते तर मी हे टोकाचे पाऊल उचलले नसते. शिवाय त्याने आपल्या आई वडीलांची माफिही मागितली आहे. मला माफ करा. माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्ती गटारात विसर्जीत करा असं ही तो म्हणाला आहे. मोहितचा भाऊ प्रताप याने ही आपल्या वहिनीवर आरोप केले आहेत. लग्नानंतर तिचे वागणे बदलले होते. शिवाय तिच्या घरच्यांकडून खोटे आरोपही केले जात होते असंही त्याने सांगितले. आपला भाऊ सततच्या धमक्यांना कंटाळला होता असंही त्याने स्पष्ट केले.
मोहितने आत्महत्या केल्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले होते. त्यांनी तिथले पुरावे ताब्यात घेतले आहेत. त्यांनी त्याची सुसाईड नोट आणि व्हिडीओ ताब्यात घेतले आहेत. ते फॉरेन्सिकच्या ताब्यातही दिले आहेत. शिवाय जे आरोप केले आहेत त्यानुसार तपासही सुरू केला आहे. आता पोलिसांना पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. मोहित बिहारच्या औरैया या जिल्ह्यातील रहिवासी होता. तो एका सिमेंट कंपनीत इंजिनिअर पदावर काम करत होता.