बदलापूर अत्याचार प्रकरण, शाळेचे फरार संचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Badlapur School Case : बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे

जाहिरात
Read Time: 1 min
बदलापूर:

निनाद करमकर, प्रतिनिधी

Badlapur School Case : बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना घडल्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी या ट्रस्टींना ताब्यात घेतलं  आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बदलापूरमधील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (1 ऑक्टोबर) त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळाला होता. त्याचबरोबर पोलिसांच्या कारभारावरही ताशेरे ओढले होते. त्य़ानंतर अखेर बुधवारी (2 ऑक्टोबर) त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

बदलापूरच्या प्रसिद्ध शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राजकारण तापलं आहे. या शाळेच्या संस्थेचे संचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर शिक्षणसंस्थेत राजकारण न आणण्याचं आवाहन भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी केला होता. तर, संचालक मंडळात फक्त भाजपाचेच नव्हे, तर शिवसेना आणि उबाठाचेही लोक असल्याची माहिती बदलापूरचे भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली होती.