मनोज सातवी
बांगलादेशी नागरिक सर्रास पण भारतात घुसखोरी करत आहेत. त्यांच्या घुसखोरीवर काही नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. घुसखोरी केल्यानंतर ते भारतात बिनधास्तपणे वास्तव्य ही करत आहे. एक दोन नाही तर तीस तीस वर्षे ते भारतात राहात असल्याचे आता समोर आले आहे. या वास्तव्यात ते आवश्यक असलेली कागदपत्र ही मिळवत आहेत हे विशेष. त्यांच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड, वोटरकार्डही असल्याचे समोर आले आहे. नालासोपाऱ्यात नुकतीच एक कारवाई करण्यात आली. त्यात ही धक्कादायक गोष्टी उघड झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नालासोपाऱ्यात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून बिनबोभाट पणे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जन्नत बाबर शेख, मोहम्मद साहीदुल अताऊल आणि रियाझ मिर्झा अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी नालासोपारा येथील आचोळ्याच्या आंबेडकरनगर येथील श्री समर्थ अपार्टमेंटमध्ये स्वतःचे घर देखील विकत घेतलं आहे. विशेष म्हणजे त्या तीन आरोपींकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटर आयडी ही होते. एक भारतीय नागरिकासाठी जी आवश्यक असलेली कागदपत्र लागतात ती सर्व कागदपत्र त्यांच्याकडे होती. त्यामुळे ते बांगलादेशी आहेत याचा कोणाला मागमूस देखील लागला नाही.
मुंबई आणि परिसरात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात राहात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी नागरिक अनधिकृत पणे राहत असल्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. आधारे आचोळे पोलीसांच्या ATS पथकाचे पोलीस उप निरिक्षक भगवान पाटिल यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. त्यांच्या विरुध्द भारतीय पासपोर्ट अधिनियमानुसार कारवाई केली. यावेळी आरोपींकडे भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व प्रकारची महत्वाची कागदपत्र सापडली.
आचोळे पोलिसांनी दुभाषिक पंचा मार्फत त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याबाबत काही वैद्य पुरावा अगर कागदपत्र आहेत काय ? याबाबत विचारणा केली. त्यांनी भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे मान्य केले. शिवाय आपण बांगलादेशी नागरीक असल्याचे ही सांगितले. तसेच गेली बरेच वर्षापासुन नालासोपारा आचोळा येथे बेकायदेशिर पणे राहत असल्याचे त्यांनी कबुल केले. तसेच यातील दोन आरोपींविरोधात 2013 साली मुंबईतमध्ये अनधिकृत वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते अशी ही माहिती ही आता तपासात उघड झाली आहे.