सागर कुलकर्णी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या भयंकर घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. यावरुनच भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेस धस यांनी गंभीर आरोप करत या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी सुरेश धस यांनी या क्रुर हत्येची भयंकर स्टोरीच सांगून टाकली.
काय म्हणाले सुरेश धस?
'संतोष देशमुख हे मस्सजोग गावचे भाचे आहेत. त्यांचं मूळ गाव बार्शीकडे आहे. लोकांची सेवा करता करता सलग सरपंच आहेत. ही काही सोपी गोष्ट नाही. शुल्लक कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला तो लोकांना लागला, लोकं रस्त्यावर आली. खून झाला त्या दिवशी रास्ता रोको करण्यात आला, वातावरण गरम झाले होते.स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास नाही.
शुक्रवारी जी घटना घडली. दलित समाजाच्या वॉचमनला अट्रॉसिटीची केस करायला गेला होता, त्याची केस घेतली नाही. कंपनीची लोकं खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेले, त्यांचीही केस घेतली नाही. सोमवारी ही घटना घडली. स्थानिकांनी ही मागणी केली की याची सीआयडी चौकशी करावी. एसपींनी तिथे लिहून दिलं आणि सरकारने मान्यता दिली,' असं सुरेश धस म्हणाले.
नक्की वाचा - Worship Act: मंदिर-मशीद वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला दिले आदेश
'शुक्रवारी कोणाच्या फोनवरून वॉचमनची आणि खंडणीची केस घेतली नाही? ते गुन्हा दाखल झाला असता तर आरोपी फरार झाले असते आणि सोमवारीची घटनाच घडली नसती. ही प्यादी आहे, यामागचा मास्टरमाईंड वेगळा आहे. त्या मास्टरमाईंडला फोन केला असेल, यांच्यापैकी कोणालातरी आदेशित केलं असेल. हाणामारा, झोडा, बघून घेऊ अशा जर फोन केला असेल तर तो डायरेक्ट 302 मध्ये आरोपी व्हायला हवा,' असंही ते म्हणाले.
SIT नेमा..
बीड एसपीच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमावी, पांडकर म्हणून इतिरिक्त एसपी आहेत त्यांना आयओ करावे, कारण सीआयडीला स्थानिक पोलीस बळ नसते. सीआयडी चौकशी पंचवार्षिक योजनाच जाईल.तोपर्यंत हे आरोपी बाहेर सुटतील. चार्जशीट 90 दिवसांच्या आतच दाखल व्हावे, आरोपींना कोणतेही अभय मिळू नये, उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी. फाशीची शिक्षा होणं गरजेचे आहे. WWF मध्ये मारतात तशा उड्या मारल्यात. दोन उड्या मारल्यावर संतोष देशमुख जागीच ठार झाला, असा खळबळजनक दावाही सुरेश धस यांनी केला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'एकतर आमच्याकडे कोणती इंडस्ट्री येत नाही. संरक्षण खात्याकडून ऑर्डर निघाल्याने 600 MG Watt 300 वर आली आहे. एकतर कंपन्या येत नाही, आल्या तर साहित्य आणणाऱ्या गाड्या अडवायला लावल्या जातात, त्यामुळे कंपनीकडून नुकसान होतं. यामुळे कंपनीवाले म्हणतात की नुकसानीपेक्षा यांना काहीतरी द्या. असे केल्याने 'आकांची' अपेक्षा वाढल्याने की कशातही पैसे मागायला लागले. सुदर्शन घुले हा जास्त वयाचा दिसतो, बाकी सगळे बारकीबारकी पोरं आहे. नेत्यांसोबत फोटो काढायचे व्हायरल करायचे असं चाललेलं असतं.
नक्की वाचा - Worship Act: मंदिर-मशीद वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला दिले आदेश
'गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना परदेशी बँकांचे कर्ज असते. कंपन्यांची लोकं दिल्ली स्थित आहेत, ते केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करू शकतात, ती लागू शकेल. छोट्या छोट्या लोकांना बळ मिळत राहीले तर हे आणखी भयानक होईल, एखादवेळी बॉम्ब ब्लास्ट होईल. संतोष देशमुखला चुकीच्या पद्धतीने मारले, त्याच्या खुनाची नीट चौकशी केली पाहीजे.
'कडक एसपी असणे गरजेचे आहे. नव्या एसपींमुळे वचक बसलाय. महादेव अॅपसारखी घटना आमच्याकडे घडली 9 अब्ज रुपयांचे व्यवहार एकाच माणसाच्या नावावर दिसले. त्यातील चांगला तपास करणारे अधिकारी एका रात्रीत बदलले जातात. अर्ध्या रात्री हे का करण्यात आले ? टाकाऊ पदार्थ उचलायचे आणि बीड जिल्ह्यात आणून टाकायचे हे काम सुरू आहे.
विष्णू चाटे वाल्मिकी कराडांचे मावस भाऊ आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे ते तालुकाअध्यक्ष आहेत. वाल्मिकी कराड यांनी खुनाचे आदेश दिले आहेत असे मी सध्या म्हणणार नाही, मात्र त्यांच्या अवतीभोवती असलेलेच हे सगळं लोकं आहेत. आता हे त्यांनी परस्पर केलं की कराडांच्या आदेशावरून केलंय हे तपासातून कळेल. वाल्मिकी कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेंवर 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा कंपनीने दाखल केला, असा आरोपही धस यांनी केला.