Beed Crime: आणखी एक वैष्णवी! पैशासाठी सुनेचा छळ, बीडमध्ये विवाहितेने आयुष्य संपवलं

 पैशाच्या हव्यासासाठीच सुनेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाईच्या गीता या गावात ही घटना घडली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

आकाश सावंत, बीड: पुण्यामधील वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत असतानाच बीडमधून एक हादरवुन टाकणारी घटना समोर आली आहे. माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी दिलेल्या त्रासातून विवाहितेने आत्महत्या केली आहे. शुभांगी शिंदे असे आत्महत्या केलेल्या या विवाहितेचे नाव आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आता बीडमध्ये देखील सासरच्या त्रासाला कंटाळून शुभांगी शिंदे  या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात देखील अंबाजोगाई व धारूर येथे दोन ऑप्टीकल्सचे दुकाने असताना देखील तिसऱ्या दुकानासाठी  पैशाच्या हव्यासासाठीच सुनेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाईच्या गीता या गावात ही घटना घडली आहे. 

ऑप्टीकल्सचे दुकाने असताना देखील तिसऱ्या दुकानासाठी वारंवार तुझ्या माहेरहून पैसे आण म्हणून पती सासू-सासरे नणंद व पतीचा मित्र यांच्याकडून शुभांगी शिंदेचा छळ सुरु होता. याच छळाला, जाचाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचललं आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.