बेंगळुरु: कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येची खळबळजनक बातमी बेंगळुरूमधून समोर आली आहे. ओमप्रकाश यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात त्यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचा अंदाज लावला जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकचे माजी डीजीपी ओमप्रकाश यांचा राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. रविवारी दुपारी 4.4.30 च्या सुमारास आम्हाला आमचे माजी डीजीपी आणि आयजीपी ओम प्रकाश यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांच्या मुलाशी संपर्क साधण्यात आला आहे आणि तो या घटनेविरुद्ध तक्रार देत आहे आणि त्या आधारावर एफआयआर नोंदवला जाईल. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
बेंगळुरूचे अतिरिक्त सीपी विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी डीजीपींच्या घरी तीन लोक उपस्थित होते. ज्यामध्ये त्याची पत्नी, मुलगी आणि तिसरी व्यक्ती तिथे उपस्थित होती. या तिघांची चौकशी सुरू आहे. या हत्येतील पत्नीला मुख्य आरोपी मानून पोलिस तपास पुढे नेत आहेत. हत्या करण्यासाठी एखाद्या धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे रक्तस्त्राव झाला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी असेही सांगितले की, डीजीपींच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. घटनेनंतर डीजीपींच्या घरी उपस्थित असलेल्या कोणीही पोलिसांना माहिती दिली नाही. एका शेजाऱ्याने पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. महत्त्वाचं म्हणजे हत्येनंतर पत्नीने एका दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करत मी हत्या केल्याची कबुली दिल्याचाही दावा केला जात आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
दरम्यान, ओम प्रकाश हे 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होतेय ते बेंगळुरूतील एचएसआर लेआउट येथील त्यांच्या घरात राहत होते. ते 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळचे बिहारमधील चंपारणचे रहिवासी होते आणि त्यांनी भूगर्भशास्त्रात एमएससी पदवी प्राप्त केली होती. 1 मार्च 2015 रोजी त्यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली.