Bank Robbery : मॅनेजरनेच लुटली बँक, फिल्मी स्टाईलनं काढले 5 कोटी! कसा सापडला जाळ्यात?

Bhandara Crime News : येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या मॅनेजरने असा काही उपद्व्याप केला की बँकेतून त्याची रवानगी थेट पोलीस कोठडीत झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
भंडारा:

तेजस मोहतुरे, प्रतिनिधी

पैशाचं अमिष दिसलं की भल्याभल्यांची बुद्धी गहाण पडते... अधिकचे पैसे मिळवण्याची संधी असेल तर लोक नोकरीही पणाला लावतात.. काहीजणांना खरोखर पैसा मिळतही असेल पण बहुतांश ठिकाणी तसं होत नाही. या पद्धतीचे  उपद्व्याप अंगलटच येण्याची शक्यता जास्त असते. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्येही हाच प्रकार घडला आहे. येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या मॅनेजरने असा काही उपद्व्याप केला की बँकेतून त्याची रवानगी थेट पोलीस कोठडीत झाली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

गौरीशंकर बावनकुळे असं या प्रकरणातल्या मुख्य आरोपी बँक मॅनेजरचं नाव ईआहे. त्यानं या बँकेतील खातेदारांची तब्बल पाच कोटी रुपये परस्पर काढले. त्यानं अगदी फिल्मी स्टाईलनं स्वत: काम करत असलेल्या बँकेवरच दरोडा टाकला. 

तू आम्हाला पाच कोटींची कॅश दे आम्ही दीड तासात तुला सहा कोटी देतो असं आमिष या मॅनेजरला एका एजन्सीने दाखवलं होतं. त्यानंतर बावनकुळेनं बँकेतल्या  खातेधारकांच्या खात्यातून ही रक्कम जमा केली. त्यानं बँकेतल्या आणखी एका साथीदाराच्या मदतीने हे पैसे गोळा केले. पण इतके पैसे बँकेत ठेवता येणं तर शक्यच नव्हतं.

( नक्की वाचा :  डोंबिवलीच्या ज्येष्ठ नागरिकाला मराठी बोलल्यामुळे अपमानास्पद वागणूक, तक्रार करण्याचाही दिला सल्ला! )

त्यांनी बँकेच्या बाजूची एक ड्रायक्लिनिंगचं दुकान गाठलं. त्या दुकानदाराला हे पैसे त्याच्या दुकानात ठेवण्यासाठी एक लाख रुपये द्यायचं कबुल केले. दुकानदाराने आणि मॅनेजरने हा पैसा दुकानात नेऊन ठेवला. पण पोलीसांना खबर लागली आणि आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकली. 

Advertisement

अचानक इतकी मोठी कॅश शहरात सापडल्याने,अनेकांना हे हवाला रॅकेट असल्याची शक्यता वाटली. पण पोलीसांनी माहिती दिल्यावर हा आपलाच पैसा होता हे लोकांच्या लक्षात आले. दीड तासात पाच कोटीचे सहा कोटी करून देतो यावर बँकेच्या मॅनेजरचा विश्वास बसावाआणि त्याने बँकेतून एवढी मोठी रक्कम रोखीने बाहेर काढावी, हे सहज पटण्यासारखं नाही. त्यामुळे गौरीशंकर बावनकुळे सांगतोय ते खरं आहे की या प्रकरणात वेगळाच काही अँगल आहे याचातपास भंडारा पोलीसांना करावा लागणार आहे. 

Topics mentioned in this article