प्रायव्हेट पार्ट आणि चेहऱ्यावर डाग! डायमंड गर्ल 'लव्ह जिहाद'ची शिकार? मुस्लिम BF रुग्णालयातून फरार अन् पुढे...

Bhopal Model Death Case : एका प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dimond Girl Death Reason
मुंबई:

Bhopal Model Death Case :  एक प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. खुशबू अहिरवार असं या महिलेचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. हे प्रकरण लव्ह-जिहादचं असल्याचं समजते. कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मुस्लिम बॉयफ्रेंड कासिम खुशबूला रुग्णालयात सोडून फरार झाला. इंदौर रोड येथील भैंसाखेडी येथे हा रुग्णालय असून पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. आरोपी कासिम उज्जेन येथील रहिवासी आहे. खुशबूच्या प्रायव्हेट पार्ट,खांदा आणि चेहऱ्यावर जखमांचे निशाण आढळल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. खुशबू परदेशात राहायची. दरम्यान, पोलिसांनी कासिमचा शोध सुरु केला आहे. तर महिलेचं पोस्टमार्टम गांधी मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे.

डायमंड गर्ल होती खुशबू

खुशबू अहिरवार सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती डायमंड गर्ल या नावाने अकाऊंट चालवत होती. तिचे जवळपास 12 हजार फॉलोअर्स होते. खुशबू कासिमसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिला खुशी वर्माच्या नावानेही ओळखलं जायचं.

नक्की वाचा >> गुलाबी साडीला टक्कर! निळ्या साडीत मार्केट जाम करणारी महिला आहे तरी कोण? रातोरात झाली फेमस

बीए फर्स्ट ईअरमध्ये शिक्षण सोडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबूने बीए फर्स्ट ईअरनंतर शिक्षण सोडलं होतं. मागील तीन वर्षांपासून ती भोपाळमध्ये राहत होती. तिने अनेक लोकल बँड्ससाठी मॉडलिंग केली होती. ती नेहमी तिच्या आईला सांगायची की, मला खूप मोठं करिअर करायचं आहे. तसच ती पार्ट टाईम जॉब करून तिचा खर्च भागवायची.

Advertisement

नक्की वाचा >> Cheapest Liquor कितीही टल्ली झाले, तरीही खिशाला लागणार नाही झळ, भारतात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त दारू!

खुशबूची आई लक्ष्मी अहिरवारने म्हटलं की, तीन दिवासंपूर्वी कासिमने तिला फोन केला होता. त्याने म्हटलं होतं की, तो मुस्लिम आहे. पण तुमची मुलगी माझ्या सोबत आहे. तुम्ही काळजी करू नका. मी त्याला सोबत घेऊन उज्जेनला जात आहे. मुलीने फोनवर म्हटलं की, तुम्ही काळजी करू नका. कासिम चांगला मुलगा आहे. मी त्याच्यासोबत आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, कासिमचं खुशबूसोबत अफेअर होतं. त्यानेच तिचा खून केला आहे.