Bhubaneswar Murder Mystery: 25 वर्षांच्या वाहतूक पोलीस कॉन्सेबल सुभामित्रा 6 सप्टेंबर रोजी ड्यूटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. दहा दिवसांपेक्षा जास्त बेपत्ता असलेल्या सुभामित्रा यांचं गूढ अखेर उलगडलं आहे. त्यांच्या पतीनंच त्यांची हत्या केली. अगदी दृश्यम चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे हे सर्व हत्याकांड आहे.
ओडिशाच्या भुवनेश्वर शहरात ही धक्कदायक घटना घडली आहे. महिला कॉन्स्टेबरलची हत्या त्यांच्या पतीनेच केल्याचे उघड झाले आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. सुभामित्रा यांनी त्याच्याबरोबर गुपचूप कोर्ट मॅरेज केले होते.
नेमकं काय घडलं?
सुभामित्रा साहू या जगतसिंहपूर जिल्ह्यातील पारादीप येथील रहिवासी होत्या. 6 सप्टेंबर रोजी त्या ड्युटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या, त्यानंतर तिचा शोध लागला नाही. तिच्या आईने दुसऱ्या दिवशी कॅपिटल पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
भुवनेश्वर-कटकचे पोलीस आयुक्त एस. देव दत्ता सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, "तपासादरम्यान पोलिसांना कळले की कॉन्स्टेबल सुभामित्रा साहूने जुलै 2024 मध्ये दीपक राऊत नावाच्या व्यक्तीसोबत कोर्ट मॅरेज केले होते. दीपक हा देखील पोलीस कॉन्स्टेबल आहे. सुभामित्राला शेवटचे दीपकसोबतच भुवनेश्वरमध्ये पाहिले गेले होते, त्यामुळे तो मुख्य संशयित होता."
हत्येचं कारण काय?
पोलिसांनी आरोपी पती दीपक राऊत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, "6 सप्टेंबर रोजी मी सुभामित्राला तिच्या कामाच्या ठिकाणाहून कारमध्ये बसवले आणि दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह भुवनेश्वरपासून सुमारे 170 किमी दूर असलेल्या क्योंझर जिल्ह्यातील घाटगाव परिसरातील जंगलात पुरला."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे आर्थिक वाद हे मुख्य कारण आहे. दीपकने सुभामित्राकडून सुमारे 10 लाख रुपये घेतले होते. सुभामित्राला हे पैसे परत हवे होते. या पैशातून सामाजिक पद्धतीने लग्न करण्याची सुभामित्रा यांची इच्छा होती. याच पैशांवरून झालेल्या वादामुळे दीपकने त्यांचा खून केला.